Nawazuddin Siddiqui And Wife Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: नवाजच्या पत्नीची सासूविरोधात पोलीस स्थानकात धाव, गंभीर आरोप करत दिली तक्रार...

नवाझुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने सासूवर गंभीर आरोप करत कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आणला आहे.

Chetan Bodke

Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी नेहमीच चाहत्यांमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकेमुळे चर्चेत असतो. यावेळी तो नाही तर त्याची पत्नी प्रकाशझोतात आली. नवाजच्या पत्नीची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता पुन्हा आलियाने सासूवर गंभीर आरोप करत कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आणला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी झैनबने नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीची आई आणि पत्नी यांच्यातील संबंध इतके खास नाहीत. याच कारणामुळे अभिनेत्याच्या आईनेही आपल्या सुनेविरोधात एफआयआर दाखल केली होती. पण आता अभिनेत्याची पत्नी आलियानेही अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. ती म्हणते की मला घरात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणते, "तिचे घरात अन्न आणि पाणी बंद करण्यात आले आहे. इतकेच नाही तर तिला स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी नाही. कोणतेही काम करुन दिले जात नाही."

सोबतच आलिया पुढे म्हणते, "मला घरातूनही बाहेर पडून दिले जात नाही, नेहमीच नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. सोबतच मला स्वयंपाकघरातही प्रवेश दिला जात नाही. इतकंच नाही तर, हॉटेलमधुन ऑर्डर करण्यात आलेले जेवणही दिले जात नाही. या सगळ्या गोष्टींची तिला खूप भीती वाटते." या प्रकरणी आलियाने अद्यापही पोलीसांना तक्रार दिलेली नाही. परंतू तिने ही सर्व हकिकत एका वकिलांना सांगितली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्दीकी आणि आलिया यांच्यात मालमत्तेवरुन अनेक दिवसांपासून वादविवाद सुरु आहे. पण आलियाने नवाझुद्दीनच्या अंधेरीतील घरी राहण्यासाठी परतली तेव्हा या प्रकरणाने आणखी वेगळे वळण घेतले. नवाजच्या आईला आलिया तिथे राहायला आली हे बिल्कुल पटलेले नव्हते.

त्याच दरम्यान नवाझुद्दीनच्या आईने मुंबईच्या वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये आपल्या सुनेविरोधात एफआयआर दाखल केली आहे. नवाजच्या आईने सुनेविरोधात कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे.

नवाजच्या वैयक्तिक आयुष्यात जरी वाद सुरू असले तरी प्रोफेशनल लाईफमध्ये तो एक मोठा स्टार आहे. लवकरच तो 'हड्डी' या सिनेमात झळकणार आहे. यात नवाज तृतीयपंथियाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT