Jogira Sara Ra Ra Teaser Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jogira Sara Ra Ra Teaser Out: जोगीचा जुगाड ठरणार चर्चेचा विषय; ‘जोगिरा सारा रा रा’ चा टीझर प्रदर्शित...

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Chetan Bodke

Nawazuddin Siddiqui New Film Teaser: बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकी गेल्या अनेक दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे बरेच चर्चेत आले होता. पत्नी आणि भाऊच्या वादात नवाझुद्दिन बराच प्रकाशझोतात आला होता. पण आता तो सध्या खासगी आयुष्यामुळे नाही तर त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या टीझरमध्ये नवाजसोबत बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माही झळकली आहे. १२ मे रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

नुकताच शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये, ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटात नवाझने जोगी प्रतापचे पात्र साकारले आहे. नेहमीच काही तरी जुगाड करत काम करण्याचं तो प्रयत्न करतो. ‘जोगीचा जुगाड कधीच फोल ठरत नाही.’ असं म्हणत टीझरची सुरूवात होते. नेहा शर्मा या चित्रपटात नवाझुद्दिनची प्रेयसी ठरली. नवाजची या चित्रपटात विनोदी भूमिका आहे. चित्रपटात हलकीफुलकी कथा आणि मजेशीर विनोदांनी असलेला हा टीझर पाहून सर्वांनाच चित्रपटाची उत्सुकता लागली.

‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटाची कथा गालिब असद भोपाली यांनी लिहिली असून यापूर्वी त्याने नवाजच्या ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ची कथासुद्धा लिहिली आहे. ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कुशन नंदी यांनी केले आहेत. त्यांनी ‘हम दम’ आणि ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटांचे देखील दिग्दर्शन केले आहे.(Latest Marathi News)

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो अखेरचा २०२२ मध्ये ‘हिरोपंती 2’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात तो ‘लैला’ नावाच्या खलनायकात दिसला होता. त्याची धडाकेबाज शैली प्रेक्षकांना बरीच भावली. सध्या ‘जोगिरा सारा रा रा’ व्यतिरिक्त इतर अनेक चित्रपट अजून प्रतिक्षित आहेत.(Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

France Protest : नेपाळनंतर फ्रान्समध्ये राडा, शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले, उद्रेक थांबवण्यासाठी ८०००० पोलिसांचा फौजफाटा तैनात

AAP MLA : आप आमदाराला कोर्टाचा दणका; तरुणीला मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी ठरवलं दोषी; फैसला कधी?

घरात मृत व्यक्तीचा फोटो कुठे लावावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या

Himachal Flood : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, ३७० जणांचा मृत्यू, ४३४ जण जखमी आणि ६१५ रस्ते बंद

Banjara Community : आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक; हैद्राबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी मोर्चा

SCROLL FOR NEXT