Shah Rukh Khan Birthday Special Post Instagram
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Post: "झुमे जो पठान, मेरी जान..." किरण मानेने किंग खानला दिल्या सातारी स्टाइलमध्ये बर्थडेच्या शुभेच्छा

Shah Rukh Khan Birthday Post: बिग बॉस फेम अभिनेता किरण मानेने शाहरुख खानसाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan Birthday Special Post

बॉलिवूडचा ‘बादशाह’ आणि ‘किंग खान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज ५८ वा वाढदिवस आहे. शाहरुख खानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. फक्त देशातच नाही तर जगभरामध्ये शाहरुखचे फॅन्स आहेत. त्याचे चाहतेही सेलिब्रिटी आहेत, त्याच्यासोबत काम करावे, ही त्यांची इच्छाही असते. अशातच बिग बॉस फेम अभिनेता किरण मानेने शाहरुख खानसाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये किरण मानेंनी आपल्या खास शैलीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, “शारख्या, त्यांना वाटलं सगळं जग आपल्या बापाचं हाय. आपन 'बायकॉट' म्हटलंकी माणूस इंडस्ट्रीतनं आऊट! आमच्या विरोधात बोलाल तर काम काढून घेवू. कोण पिच्चरला येणार नाय अशी व्यवस्था करू. 'हम करे सो कायदा' म्हणत त्यांनी गेम करायला सुरूवात केली. कलाकारांमधली दोन चार टाळकी विरोधात बोलत होती, ती बी भेदरुन गप झाली. मग काय, बायकॉट गॅंगला वाटलं 'साला आपुनईच भगवान है" ! ह्या गॅंगच्या तू कायम टारगेटवर होतास. तू पाकिस्तानधार्जिना आहेस असं खोटं पसरवलं. तुझ्या मुलाला खोट्या प्रकरणात अडकवलं गेलं. तवा तर गॅंगनं हैदोस घातला. लतादिदींच्या पार्थिवाजवळ फुंकर मारल्यावर 'तू थुंकला' असा कांगावा करत धिंगाणा घातला.” (Social Media)

“...लै मोठ्या गॅपनंतर तू आलास. नेहमीच्या स्वॅगमधी चालत... कापणारी नजर रोखत... केस उडवत. फूल्ल श्टाईल में ! बायकॉट गॅंग चेकाळली. 'आता ह्याला रस्त्यावर आणूया, लै माज करतोय स्स्साला' म्हणत मोहिम सुरू केली. आल्याआल्या तू असा 'पठान' लावला, का सात-आठशे करोड कमावल्याशिवाय काढलाच नाहीस. बायकॉट गॅंग कळवळून बोंबलायला लागली. बाकी सगळं जग धुंद होऊन नाचत होतं "झुमे जो पठान, मेरी जान, महफिल ही लूट जाये." कम्बख़्त कारस्थानी गॅंग धक्क्यातनं सावरेपर्यंत 'जवान' लावलास... खाडकन मुस्काडात देत म्हन्लास, "बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर..." परत हजार करोडचा दांडगा धुमाकूळ !” (Marathi Actor)

“शारख्या, माणूस म्हणून तू लै लै लै ग्रेट हायेस. तुझं समाजभान, तुझी बुद्धीमत्ता, तुझं वाचन, तुझा सेन्स ऑफ ह्यूमर... आन् सगळ्यात महत्त्वाचं, जे मी लै 'रिलेट' करतो, तो म्हणजे संकटावर उलटी चाल करून जाणं. निधड्या छातीनं. ज्या काळात सत्ताधार्‍यांविरोधात एक शब्दबी उच्चारणं म्हणजे काम हातातनं घालवणं... नायतर मागे ईडी लावुन घेनं... लैच झालं तर तुरूंगात जानं. त्या दहशतीच्या काळात तू थेट सिनेमातनं डंके की चोटपर भारतीय नागरीकांना सांगितलंस. ” (Bollywood)

“ “जात-पात-धर्म-संप्रदाय के लिए व्होट देने के बजाय, जो आपसे व्होट मांगने आए, आप उससे सवाल पुछो! पुछो उससे के अगले पांच साल तक तुम मेरे लिए क्या करोगे? मेरे बच्चोंकी शिक्षा के लिए क्या करोगे? मुझे नौकरी देने के लिए क्या करोगे?? मै अगर बिमार पड गया तो मेरे परिवार के लिए क्या करोगे??? अगले पांच साल तक तुम मेरे देश को आगे बढाने के लिए क्या करोगे... पुछो उससे.” शारख्या, आज तुझा बड्डे! लै लै लै जग. आम्हाला बख्खळ आनंद दे. प्रेरणा दे. मनोरंजन, स्वॅग आणि समाजभान याचा कॉम्बो असलेला लाभावा ही आमची 'मन्नत' खुदानं पुरी केलेलीच हाय. असेच नादखुळा पिच्चर आणून तू आम्हाला 'जन्नत' दाखव. लब्यू शारख्या...”असे ते म्हणाले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT