Chandu Champion Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chandu Champion Collection : कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद; पहिल्या दिवशी किती गल्ला जमवला? जाणून घ्या...

Chandu Champion Day 1 Box Office Collection : भारताला पॅराऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे.

Chetan Bodke

भारताला पॅराऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांचा जीवनपट अखेर थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असलेला 'चंदू चॅम्पियन' चित्रपट १४ जूनला रिलीज झालेला आहे. हे मुरलीकांत पेटकर मुळचे महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील आहे. यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर दिग्दर्शक कबीर खान यांनी आणला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'चंदू चॅम्पियन' चित्रपट तुफान चर्चेत आलेला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा अखेर समोर आला आहे. या चित्रपटाची सुरुवात दिलासादायक पद्धतीने झाली आहे.

कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' चित्रपट बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दिलासादायक सुरुवात झालेली आहे. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट बंपर कमाई करेल, अशी निर्मात्यांना अपेक्षा होती. पण असं काहीच घडलेलं नाही. या चित्रपटासाठी कार्तिकने विशेष ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

समोर आलेल्या कमाईच्या आकड्यात कदाचित थोडे बदल होऊ शक्यता आहे. मुरलीकांत पेटकर यांच्या बायोपिकची निर्मिती तब्बल १२० कोटी रुपयांमध्ये झालेली आहे. निर्मितीचा खर्च पाहता, चित्रपटाची पहिल्या दिवसापासून झालेली सुरुवात निराशाजनकच म्हणावी लागेल. आता शनिवार आणि रविवारी हा चित्रपट कशी कमाई करणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत भुवन अरोरा, राजपाल यादव, यशपाल शर्मा, विजय राज, अनिरुद्ध दवे, पलक लालवानी आणि इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone: 'एवढ्या प्रेमाने भारताला प्रमोट केलं असतं...'; हिजाब परिधान केल्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल,नेमकं प्रकरण काय?

Mumbai Traffic : BKC मधील प्रवास महागणार! ५० मिनिटांत बाहेर न पडल्यास ‘कंजेशन फी’ आकारली जाणार

Mumbai: भारताच्या स्टार क्रिकेटपटूला अंडरवर्ल्डकडून धमकी, ५ कोटींच्या खंडणीची मागणी

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

SCROLL FOR NEXT