Kartik Aaryan Ready To Wear His Lower His Fees Instagram @kartikaaryan
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan Fees : कार्तिक आर्यन फीसमध्ये मोठी घट करण्याच्या तयारीत, नेमकं कारण काय ?

Kartik Aaryan Ready To Wear His Lower His Fees : 'चंदू चॅम्पियन' फेम कार्तिक आर्यननेही आपल्या फीमध्ये मोठी घट करण्याची तयारी दर्शवली आहे. नेमका तो असा का म्हणाला, जाणून घेऊया...

Chetan Bodke

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या फीमध्ये गेल्या अनेक दिवसांमध्ये घसघशीत वाढ होताना दिसत आहे. अनेकांनी आपल्या कामामुळे फीमध्ये घसघशीत वाढ केली आहे, तर काहींनी फीमध्ये कपात केली आहे. अशातच आता 'चंदू चॅम्पियन' फेम कार्तिक आर्यननेही आपल्या फीमध्ये मोठी घट करण्याची तयारी दर्शवली आहे. अभिनेत्याने ही तयारी मुलाखतीतून दर्शवली असून, आपल्याप्रमाणेच इतरांनाही पैसे कमावण्याची संधी मिळायला हवी, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

कार्तिक आर्यनने नुकतीच फिल्म कॅम्पिनियनला मुलाखत दिली. सध्या अभिनेता 'चंदु चॅम्पियन' चित्रपटामुळे तुफान चर्चेत आहे. मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, "जर कोणत्याही सेलिब्रिटीला डिजिटल राईट्स, सॅटेलाईट राईट्स किंवा थिएट्रिकल बिजनेसच्या माध्यमातून त्याला चांगल्या पद्धतीचा पैसा उपलब्ध होत असेल. तर त्याला कदाचित पुढे चांगली फी मिळण्याची शक्यता आहे. जर असं नसेल तर त्या सेलिब्रिटीने आपल्या फीमध्ये घट करावी. बाकीच्यांचं काहीही होऊदे, पण मी पैसे कमावणारंच, या मानसिकतेने मी कधीच काम करीत नाही."

कार्तिकने पुढे मुलाखतीत सांगितले की, "सर्वच ठिकाणी आपण एकट्यानेच कमावावे, असं नाही. असे अनेक सेलिब्रिटी करतात. आपण आपल्या फीमध्ये घट केल्याने आपल्या प्रमाणेच, आपले को- स्टार्सही कमावतील अशी भावना आपल्यात असायला हवी. ही खूप मोठी अर्थव्यवस्था आहे. आपल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही उत्तम कमाई करायला हवी. मी नेहमीच माझ्या फीज मध्ये कपात करायला तयार आहे. कारण चित्रपटाची निर्मिती करण्यामध्ये अनेक जणांनी हातभार लावला आहे. सर्वांच्या घरी पैसे पोहोचायला हवे. दिवस- रात्र सगळेच कष्ट करतात. प्रत्येकाला त्याचा मोबदला मिळायलाच हवा."

कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' येत्या १४ जूनला रिलीज होणार आहे. भारताचे पहिले पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटासाठी कार्तिकने ३५ ते ४० कोटी इतके मानधन स्वीकारले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT