Chetan Bodke
सध्या सोशल मीडियावर तेजा सज्जा स्टारर 'हनुमान' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाने दोन आठवड्यातच १३९ कोटींचा टप्पा गाठलाय.
चित्रपटामध्ये साकारलेल्या तेजाच्या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
नेमका 'हनुमान' स्टारर तेजा सज्जा कोण आहे, त्याचं नेटवर्थ किती याबद्दल जाणून घेणार आहोत.
तेजा सज्जा मुळचा हैदराबादचा असून त्याने वयाच्या दुसऱ्या वर्षीच चिरंजीवीच्या 'Choodalani Vundi' चित्रपटातून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं.
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ओ बेबी' चित्रपटात तेजा सज्जा समांथा रूथ प्रभूसोबत प्रमुख भूमिकेत दिसला होता.
तेजाची काही मीडिया रिपोर्टनुसार, १५ ते २० कोटींची एकूण संपत्ती आहे.
तेजा एका चित्रपटासाठी १ ते १.५ कोटी इतकं मानधन आकारतो.
तेजा सज्जाचे वार्षिक उत्पन्न दोन ते तीन कोटींच्या आसपास आहे.
चित्रपटाचे मानधन आणि ब्रँडिंगच्या माध्यमातूनही तेजा पैसे कमावतो.