Chetan Bodke
अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या एका हटक्या साडीच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच आलियाने सौदी अरेबियातल्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यातले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या पुरस्कार सोहळ्यामधील आलिया भट्टच्या हटक्या फॅशनवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
आलिया भट्टने या पुरस्कार सोहळ्यामध्ये साडी नेसून पापाराझींना हटक्या अंदाजामध्ये कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिल्या आहेत.
आलियाने लाल आणि निळ्या रंगाची साडी नेसली होती. या साडीवर गोल्डन वर्क केले होते.
आलियाने या साडीवर नॉर्मल मेकअप आणि हेवी इअररिंग्स वेअर करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.
आलियाच्या या लूकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
आलियाच्या सौंदर्याची कायमच फक्त देशातच नाही तर परदेशातही जोरदार चर्चा होताना दिसते.
आलिया भट्टच्या साडीतील लूकवर लाखो लाईक्स मिळाले असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच आलियाला ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.