HBD Jackie Shroff SAAM TV
मनोरंजन बातम्या

HBD Jackie Shroff : एकेकाळी शेंगदाणे विकणारा जग्गू दादा आता कोट्यवधींचा मालक, जॅकी श्रॉफ यांचा संघर्षमय प्रवास

Jackie Shroff Net Worth : आज बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा वाढदिवस आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. आता ते किती कोटींचे मालक आहेत, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची हटके ओळख निमार्ण करणाऱ्या जॅकी श्रॉफ यांचा आज (1 फेब्रुवारी ) वाढदिवस आहे. जॅकी श्रॉफ आज 68 वर्षांचे झाले आहेत. जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील एक दिग्गज अभिनेते आहेत. इंडस्ट्रीत येण्याआधी त्यांनी खूप कठीण काळ पाहिला आहे. गेली अनेक वर्षे त्याच उत्साहाने आणि एनर्जी ते दमदार चित्रपट देत आहेत. त्यांच्या अभिनयाचे आणि स्टाइलचे चाहते दिवाने आहेत. जॅकी श्रॉफ यांनी 'हिरो' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले.

जॅकी श्रॉफ यांचा आत्मविश्वास, डायलॉग बोलण्याची स्टाइल सर्वच लय भारी आहे. जॅकी श्रॉफ यांचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफ प्रसिद्धीच्या झोकात आले. या सिनेमानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आज इंडस्ट्रीत जॅकी श्रॉफ यांना बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणून ओळखले जाते. एका मीडिया मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी सांगितले होते की, त्यांना पत्रकार बनायचे होते. त्यांनी भावाच्या निधनानंतर ११वी नंतर शिक्षण सोडलं.

जॅकी श्रॉफ नेटवर्थ

एकेकाळी कामासाठी भटकणारे जॅकी श्रॉफ आता कोट्यवधींचे मालक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती जवळपास 212 कोटींच्यावर आहे. जॅकी श्रॉफ यांचा मुंबईत 8 बीएचके आलिशान अपार्टमेंट आहे. तसेच त्यांच्याकडे कोट्यवधींच्या लक्जरी कार्सदेखील आहेत. जॅकी श्रॉफ यांचा लोणावळा आणि मावळमध्ये फार्महाऊस आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, जॅकी श्रॉफ एका चित्रपटासाठी जवळपास 1.5 कोटी रुपयांचे मानधन घेतो. जॅकी श्रॉफ यांच्याकडे बीएमडब्ल्यू, जीटी यांच्या गाड्या आहेत. जॅकी श्रॉफ थॅलेसेमिया इंडियाचे ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहेत.

इंडस्ट्रीत येण्याआधी पैसे कमावण्यासाठी इंडस्ट्रीत सिनेमाचे पोस्टर चिकटवणे, थिएटर बाहेर शेंगदाणे विकणे, सिगारेट विकण्याची कामे करत होते. पुढे त्यांनी ट्रॅव्हल एजेंटची नोकरी केली. त्यांनी वयाची ३३ वर्ष चाळीमध्ये घालवली. त्यांना शिक्षण नसल्यामुळे अनेक चांगल्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत. जॅकी श्रॉफ यांनी मॉडेलिंग देखील केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT