Rakhi Sawant: राखीचं पाकिस्तानची सून होण्याचे स्वप्न भंगलं; दोदी खानने लग्नाला दिला नकार, पाहा VIDEO

Dodi Khan Video : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत पाकिस्तानी अभिनेता दोदी खानसोबत लग्न करणार होती. मात्र आता स्वतः दोदी खानने लग्नाला नकार दिला आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
Dodi Khan Video
Rakhi SawantSAAM TV
Published On

ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या तिसऱ्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. अलिकडेच राखी सावंतने पाकिस्तानी अभिनेता दोदी खानसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे राखी सावंत आता पाकिस्तानची सून होणार अशा चर्चो सोशल मीडियावर रंगल्या होत्या. स्वतः दोदी खानने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून राखी सावंतला लग्नाची मागणी घातली होती.

पाकिस्तानी अभिनेता दोदी खानने(Dodi Khan) पुन्हा सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याने राखी सावंतसोबतच्या लग्नाला नकार देऊन, तिचे कौतुक देखील केले आहे. दोदी खानने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "माझ्या भारत आणि पाकिस्तानमधील मित्रांनो! तुम्ही सोशल मीडियावर माझा एक व्हिडिओ पाहिला असेल, काही दिवसांपूर्वी मी राखी सावंतला लग्नासाठी प्रपोज केले होते. प्रपोज करण्याचे कारण असे की, मी राखीला खूप दिवसांपासून पाहत आहे. मी पाहिले की ती खूप चांगली व्यक्ती आहे. राखीने तिच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे."

पुढे दोदी खान म्हणाला की, "तिने तिचे आई-वडील गमावले. आईच्या आजारपणी शेवटपर्यंत ती सोबत होती. जेव्हा एखाद्या व्यक्तीने तिच्या आयुष्यात प्रवेश केला. तेव्हा ती खूप खचली. मात्र यावर तिने मात केली. राखीने आता इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिने आपले नाव फातिमा केले. ही खरोखर मोठी गोष्ट आहे. मला ती आवडली आणि मी तिला प्रपोज केले. मात्र मला आता अनेक नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत आणि जे मला सहन होत नाही."

शेवटी दोदी खान म्हणाला, " राखी जी, तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस. पण आपण लग्न करू शकत नाही. तू दोदी खानची वधू बनू शकणार नाहीस. पण मी तुला वचन देतो की तू नक्कीच पाकिस्तानची सून होशील. मी तुझे लग्न पाकिस्तानातील माझ्या एका भावाशी करून देईन."

Dodi Khan Video
Deva Advance Booking : शाहिदीच्या 'देवा' चित्रपटानं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कितीचा गल्ला जमवला? वाचा कलेक्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com