Shreya Maskar
छोटी सुट्टी म्हटलं की, अनेक लोक लोणावळा- खंडाळा फिरण्याचा प्लान करतात.
पण नेहमी तिच ठिकाण पाहून कंटाळा आला असेल तर, लोणावळ्यातील या बेस्ट लोकेशनला आवर्जून भेट द्या.
लोणावळ्यातील हे ठिकाण खूप कमी लोकांना माहित आहे. येथे पोहचताच तुमचं मन आनंदाने बहरून जाईल.
ड्यूक्स नोज हे लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्याने समृद्ध ठिकाण आहे.
ड्यूक्स नोज पॉइंटवरून डोळ्यांचे पारणे फेडणारे खंडाळा घाटाचे दृश्य दिसते.
ड्यूक्स नोजला नागफणी नावाने ओळखले जाते.
सापाच्या टोकदार डोक्याच्या भागासारखा कठडा असल्यामुळे याला नागफणी म्हणतात.
येथे तुम्हाला उंच दऱ्या आणि हिरवीगार वनराई पाहायला मिळेल.
ड्यूक्स नोज हे ठिकाण ट्रेकिंग, हायकिंग आणि रॉक क्लायबिंगसाठी लोकप्रिय आहे.
येथे तुम्हाला शिव मंदिर पाहायला मिळेल.
आपल्या जोडीदारासोबत दोन क्षण निवांत घालवण्यासाठी हे सुंदर ठिकाण आहे.