Irrfan Khan Birth Anniversary Saam TV
मनोरंजन बातम्या

Irrfan Khan Birth Anniversary: बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही गाजवलं नाव; इरफान खानची कशी होती सिनेकारकिर्द

Irrfan Khan News: बॉलिवूड अभिनेता इरफान खान आज जरीही आपल्यात नसला तरीही, तो त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या स्वप्नात कायम आहे. आज (७ जानेवारी) हा त्याचा वाढदिवस आहे.

Chetan Bodke

Irrfan Khan Birth Anniversary

बॉलिवूड अभिनेता इरफान खान आज जरीही आपल्यात नसला तरीही, तो त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या स्वप्नात कायम आहे. २९ एप्रिल २०२० रोजी इरफान खानचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. आज (७ जानेवारी) हा त्याचा वाढदिवस आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर फक्त बॉलिवूड मध्येच नाही तर, हॉलिवूडमध्येही त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना इरफान खानने अभिनयामध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. आज आपण अभिनेत्याच्या जयंती निमित्त त्याच्या सिनेकारकिर्दिवर भाष्य करणार आहोत.

उत्तम अभिनय आणि विशेष संवादशैली या गोष्टीमुळे इरफान खानने आपला चाहतावर्ग फार मोठ्या प्रमाणात निर्माण केला होता. इरफानचा जन्म राजस्थानच्या टोंकमधल्या एका नवाबी कुटुंबात झाला होता. ७ जानेवारी १९६७ रोजी त्याचा जन्म झाला असून त्याचं खरं नाव ‘साहेबजादे इरफान अली खान’ असे होतं. इरफानला लहानपणापासून क्रिकेटर व्हायची इच्छा होती. पण चित्रपट पाहूनच त्याच्या मनात चित्रपटांविषयी गोडी निर्माण झाली. इरफान ज्या गावामध्ये राहायचा त्या गावात थिएटर नव्हतं. म्हणून तो आत्याच्या गावी गेल्यावर तो भिंतीवरून उडी मारून चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये जाऊन बसायचा. इथूनच त्याच्यात चित्रपटांविषयी गोडी निर्माण झाली.

त्यावेळी इरफानला एका व्यक्तीने एनएसडीमध्ये (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) जाऊन अभिनय शिकण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून त्याला अभिनयामध्ये आवड निर्माण झाली. एनएसडीमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर तिथून उत्तीर्ण होऊन तो मुंबईत दाखल झाला. घरादारापासून लांब आलेल्या इरफानने एका मित्राच्या मदतीने एसी मेकॅनिक म्हणून काम करायला सुरुवात केली. आपल्या स्ट्रगलच्या काळामध्ये अभिनेत्याने दूरदर्शन, सेट इंडिया, स्टार प्लस या सुरुवातीच्या काळातील मनोरंजन वाहिन्यांमध्ये मिळेल काम करण्यास सुरुवात केली होती. ‘चंद्रकांता’, ‘चाणक्य’, ‘भारत एक खोज’, ‘श्रीकांत’, ‘बनेगी अपनी बात’सारख्या टेलिव्हिजन सिरीयलमध्ये त्याने काम केले.

इरफानने ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली. आपल्या सिनेकारकिर्दित त्याला जागतिक स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यासोबतच त्याला ऑस्करसाठी नामांकनदेखील मिळाले. इरफानला पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्कार ‘हासिल’ चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी मिळाला होता. त्यानंतर इरफानला ‘पानसिंग तोमर’साठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तर इरफानला २०११ मध्ये 'पद्मश्री' पुरस्कारासाठी गौरविण्यात आले होते.

कर्करोगाशी प्रदीर्घ काळासाठी झुंज दिल्यानंतर अभिनेता इरफान खानने २९ एप्रिल २०२० रोजी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ५३ व्या वर्षी अभिनेत्याने अचानक एक्झिट घेतल्यामुळे या अष्टपैलू अभिनेत्याने होऊ घातलेल्या नवोदित कलाकारांसाठी कलेचा कधीही न संपणारा साधा आणि वारसा मागे ठेवला. त्यामुळे इरफान जरीही आज आपल्यात नसला तरीही त्यांचं अस्तित्वं मात्र विविध रुपांनी आपल्यात असल्याची बाब नाकारता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT