Govinda SAAM TV
मनोरंजन बातम्या

Govinda : गोविंदाच्या इव्हेंटमध्ये राडा! बाउन्सरने धक्काबुक्की केल्याने वाद चिघळला, VIDEO व्हायरल

Govinda Viral Video : गोविंदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

गोविंदाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गोविंदाच्या इव्हेंटमध्ये मोठा गोंधळ होतो.

बाउन्सरने धक्काबुक्की केल्याने वाद टोकाला जातो.

बॉलिवूडचा सुपस्टार गोविंदा कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्या स्टाइलचे आणि अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. तो अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतो. त्याला पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करतात. गोविंदा बॉलिवूडचा 'हिरो नंबर १' आहे.

'आजतक'च्या रिपोर्टनुसार, काल रात्री गोविंदा एका कार्यक्रमात दिसला. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तो काळ्या रंगाच्या सूटममध्ये खूपच हँडसम दिसत होता. गोविंदाने कार्यक्रमात सुंदर डान्स केला देखील केला. सर्वजण कार्यक्रमाचा आनंद घेत असताना गोंधळ उडाला. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका बाउन्सर आणि पापाराझीमध्ये झटापट झालेली दिसत आहे. अभिनेत्याच्या बाउन्सरने पापाराझींना थांबवले आणि त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे पापाराझी संतापले आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर गोविंदाने तिथे येऊन परिस्थिती शांत केली. दोघांना शांत केले आणि गोविंदा तेथून निघून गेला. अभिनेत्याने शांतपणे परिस्थिती हाताळली.

गोविंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांच्या भरभरून कमेंट्स येत आहेत. नेटकरी अभिनेत्याच्या कृतीचे कौतुक करत आहेत. गोविंदाने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यात 'आँखें' (१९९३), 'हिरो नं. १' (१९९७), 'साजन चले ससुराल' (१९९६), 'राजा बाबू' (१९९४), 'कुली नं. १' (१९९५), 'दुल्हे राजा' (१९९८) आणि 'पार्टनर' (२००७) यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : नवीन कपडे पहिल्यांदा धुतल्यानंतर रंग जातो? 'हे' उपाय घरच्या घरी करा ट्राय

Natural Pink Glow: कश्मिरी मुलींसारखा नॅचरल गुलाबी ग्लो पाहिजे? मग घरीच तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरा

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील रस्त्यांसह महामार्गांचीही दुरवस्था, नागरिकांचे प्रचंड हाल

भाजपचा विधानसभेसाठी मास्टरप्लॅन! राज्यपातळीवर पक्षात मोठे बदल; कोणाची कुठे नियुक्ती?

Accident: भाविकांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकची कारला धडक; ६ मित्रांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT