Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये राडा; धक्काबुक्की करत खलिस्तानीची घोषणाबाजी

Diljit Dosanjh: कॅनडामध्ये दिलजीत दोसांझच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये खलिस्तान समर्थकांनी गोंधळ घातला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Diljit Dosanjh
Diljit DosanjhSaam Tv
Published On

Diljit Dosanjh: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ सध्या कॅनडामध्ये असून तिथे त्याच्या लाईव्ह कॉन्सर्ट आयोजन सुरु आहे. पण या लाईव्ह कॉन्सर्टच्या वेळी एक धक्कादायक घडना घडली आहे. दिलजीतचा 'Aura-2026' (ऑरा-२०२६) हा कॉन्सर्ट सुरु असताना काही खलिस्तानी समर्थकांनी आंदोलन करायला सुरुवात केली. त्यामुळे कॉन्सर्टमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

दैनिक भास्करच्या माहितीनुसार, हा कॉन्सर्ट सुरू असताना काही लोकांनी खलिस्तानचे झेंडे फडकवत जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी त्यांनी भारतविरोधी घोषणा देत दिलजीत दोसांझ याच्यावरही गंभीर आरोप केले. काही आंदोलकांनी दिलजीत दोसांझ भाजप-आरएसएसचा एजंट असल्याचे म्हणत गायकावर निशाणा साधला.

Diljit Dosanjh
The Family Man: श्रीकांत तिवारी इज बॅक; ‘द फॅमिली मॅन’च्या नव्या सीझनबद्दल मनोज वाजपेयींचा मोठा खुलासा

गोंधळ वाढताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करताना त्यांच्यात आणि सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. काही काळासाठी कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला होता.

कॉन्सर्टमध्ये घोषणाबाजी करणाऱ्यांमध्ये पवनदीप सिंग बासी आणि मनदीप सिंग रवी या दोन व्यक्तींचा समावेश होता. या दोघांचाही संबंध दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या 'सिख्स फॉर जस्टिस' (SFJ) या संघटनेशी असल्याचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे. ही पहिलीच वेळ नाही की दिलजीत दोसांझ यांना अशा प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. याआधीही विविध देशांतील त्यांच्या कार्यक्रमांमध्ये खलिस्तान समर्थकांनी विरोध दर्शवला होता.

Diljit Dosanjh
Sanjay Dutt: संजय दत्तने मागितली महिला आयोगासमोर लेखी माफी; 'सरके चुनर' वादानंतर ५० मुलींच्या शिक्षणाचा उचलणार खर्च

दिलजीत दोसांझच्या कामाबद्दल

संगीत क्षेत्राव्यतिरिक्त, दिलजीत दोसांझ नुकताच 'बॉर्डर २' या चित्रपटात दिसला, जो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. आता तो इम्तियाज अली दिग्दर्शित आगामी चित्रपट मैं वापस आऊंगा यामध्ये झळकणार आहे. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com