Famous Actor  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याच्या डोक्यावरून बापाचे छत्र हरवलं, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Famous Actor Father Death : प्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर करून ही दुःखद बातमी दिली आहे.

Shreya Maskar

अभिनेता आणि कॉमेडियनवर कोसळला दुःखाचा डोंगर

अभिनेत्याच्या वडिलांचे निधन

अभिनेता 'द कपिल शर्मा' साठी ओळखला जातो.

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडीयनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 'द कपिल शर्मा' मधून लोकप्रिय झालेला कॉमेडीयन राजीव ठाकूरच्या वडिलांचे निधन झाले आहे. अभिनेत्याने यासंबंधित भावुक पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.

अभिनेता राजीव ठाकुरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी वडिलांसोबतचे काही खास फोटो शेअर करून त्याला सुंदर कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "शेवटचे हसणे...पापा चले गये" त्यांने वडिलांसोबतचे हसतानाचे, आनंदाचे क्षण घालवतानाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्याचा आपल्या वडिलांसोबत खूपच भन्नाट बॉन्ड होता. वडिलांच्या अशा निधनाने अभिनेत्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अभिनेत्याच्या दुःखात मनोरंजन विश्व देखील सामील झाले आहे. अभिनेत्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी समजताच इंडस्ट्रीतील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याच्या वडिलांवर श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच या कठीण काळात कलाकार राजीव ठाकुरच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

राजीव ठाकुरचे करिअर

राजीव ठाकुर हे कॉमेडी विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राजीव ठाकूर यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत येण्यापूर्वी पंजाबी रंगभूमीवर आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सीझन ३' मुळे त्याला ओळख मिळाली. त्यानंतर 'कॉमेडी सर्कस'मुळे एक ओळखीचा चेहरा बनले. राजीव 'द कपिल शर्मा शो' आणि 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्येही दिसला आहे. अभिनेत्यान आपल्या विनोदी शैलीने चाहत्यांचे मन जिंकले आहे. टीव्ही शो व्यतिरिक्त, राजीवने चित्रपटांमध्येही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Health Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या 'या' मसाल्याचं पाणी; फायदे वाचून व्हाल थक्क!

Vijay-Trisha Viral Video: अजित कुमारच्या रेसिंग इव्हेंटमध्ये CM विजय आणि तृषा कृष्णन एकत्र; व्हिडीओ व्हायरल

Bribe Case : सरकारी कामासाठी लाच घेताना बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं, ठाण्यात खळबळ

Relationship Tips : का वाढतोय घटस्फोटाचा ट्रेंड? जोडप्यांनी सांगितली लग्न तुटण्याची ७ मोठी कारणं

SCROLL FOR NEXT