Bollywood Actor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bollywood Actor : बॉलिवूड अभिनेत्याला चुलतीने फसवले, बनावट कागदपत्रे वापरून कोट्यवधींची मालमत्ता लुबाडली

Bollywood Actor Property Dispute : प्रसिद्ध अभिनेत्याच्या कुटुंबातील वडिलोपार्जित मालमत्तेचा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. सात जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्याच्या कुटुंबात वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद

अभिनेत्याने सात जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला

पोलीस तपास सुरू आहे.

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता चंद्रचूड सिंहच्या कुटुंबातील वडिलोपार्जित मालमत्तेचा वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. त्याचा भाऊ आणि चित्रपट दिग्दर्शक अभिमन्यू सिंहने फसवणूक, बनावटगिरी आणि गुन्हेगारी कट रचणे या कलमांखाली सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका कथित बनावट मृत्युपत्राच्या आधारे, एका जुन्या हवेलीसह कोट्यवधी रुपयांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर त्यांनी कब्जा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अभिनेता चंद्रचूड सिंह यांनी भारत समाचारला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधित माहिती दिली. चंद्रचूड सिंहच्या म्हणण्याप्रमाणे, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास घेत आहेत. हा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. या प्रकरणी दोन्ही भावांनी यापूर्वी एसएसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असून, दुसऱ्या बाजूनेही त्यांच्यावर आरोप केले आहेत. अभिमन्यू सिंह यांनी १४ ऑगस्ट रोजी रोरवार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात गायत्री देवी, जय सिंग, अंजनी सिंग, रॉबिन एकेशन, संदीप कुमार सिंग, शिव कुमार आणि वकील अजित सिंग तोमर यांची नावे आहेत.

अभिमन्यू सिंहने आरोप केला आहे की, त्यांच्या आजी, दिवंगत सीता देवी यांनी १८ ऑक्टोबर १९९४ रोजी नोंदणीकृत केलेल्या मृत्युपत्राद्वारे आपली मालमत्ता पती हरेंद्र पाल सिंह यांच्या नावे केली होती. सीता देवी यांचे १९९५ मध्ये निधन झाले. त्यानंतर ३१ जानेवारी १९९७ रोजी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात हरेंद्र पाल सिंग यांचे निधन झाले.

अभिनेत्याने असा आरोप आहे की, हरेंद्र पाल सिंह यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी, ३० जानेवारी १९९७ रोजी एक बनावट आणि अनोंदणीकृत मृत्युपत्र तयार करण्यात आले. त्यात मालमत्तेचा मोठा हिस्सा गायत्री देवी, त्यांची मुलगी अंजनी सिंग आणि मुलगा जय सिंग यांच्या नावे केल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, हरेंद्र पाल सिंह डिसेंबर १९९६ पासून गंभीर आजारी आणि अंथरुणाला खिळलेले होते. ते वाचू, लिहू शकत नव्हते किंवा लोकांना ओळखू शकत नव्हते. त्यामुळे, त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी मृत्युपत्र तयार करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तक्रारीत कुटुंबातील सदस्य गिरजा कुमारी, ज्या गिरजा मनचंदानी म्हणूनही ओळखल्या जातात, यांच्या जबाबाचाही उल्लेख आहे. तिच्या म्हणण्यानुसार, असे कोणतेही मृत्युपत्र बनवले गेले नाही आणि त्यावरील सह्या बनावट आहेत. कथित मृत्युपत्राचा साक्षीदार असलेल्या संदीप कुमार सिंह याच्यावरही बनावटगिरीचा आरोप आहे. तक्रारदाराने गंगा सिंह आणि वकील अजित सिंग तोमर यांच्यावर मृत्युपत्र तयार करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

एकंदर असा आरोप आहे की, या कथित मृत्युपत्राच्या आधारे, महसूल न्यायालयात नाव हस्तांतरित केल्यानंतर वडिलोपार्जित जमिनी विकण्यात आल्या. पोलीस ठाण्याचे प्रभारी रवींद्र चंद्रावल यांनी सांगितले की, या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. सर्व संबंधित पक्षांचे जबाब लवकरच घेण्यात येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT