काँग्रेसचा दारुण पराभव; अपक्ष उमेदवाराचा दणदणीत विजय, भाजप प्रणित संघटनेची काय स्थिती?

DUSU Election Results 2026: दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकीत ABVPने चारपैकी तीन प्रमुख पदांवर विजय मिळवला. यश डबास अध्यक्षपदी विजयी झाले, तर अपक्ष दीपांशु शौकीन यांनी उपाध्यक्षपद पटकावले.
DUSU ELECTION RESULTS 2026
DUSU ELECTION RESULTS 2026saam tv
Published On

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठे यश मिळाले आहे. चार प्रमुख पदांपैकी तीन पदांवर ABVP च्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराने बाजी मारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थी संघाच्या सर्वात महत्वाच्या अध्यक्षपदावर ABVP चे उमेदवार यश डबास यांनी विजय मिळवला. मतमोजणीच्या अंतिम फेरीनंतर अध्यक्षपदासाठी यश डबास यांना 24,576 मते मिळाली. त्यांनी काँग्रेस प्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI)चे उमेदवार विजय शंकर मीणा यांचा पराभव केला. मीणा यांना 22,523 मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाली. मात्र, अखेर यश डबास यांनी आघाडी कायम ठेवत अध्यक्षपद आपल्या नावावर केले.

विजयानंतर यश डबास यांनी विद्यार्थी आणि समर्थकांचे आभार मानले. ही सामाजिक समरसता, राष्ट्रवाद आणि संघटनेच्या सामूहिक ताकदीची विजय असल्याचे त्यांनी म्हटले. पंजाब विद्यापीठापासून दिल्ली विद्यापीठापर्यंत सर्व शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनी हा विजय निश्चित करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. या निवडणुकीत NSUIचा पूर्णपणे सफाया झाला, असा दावा डबास यांनी केला. ल्या निवडणुकीतही विद्यार्थी परिषदेने 3-1 असा विजय मिळवला होता आणि यंदाही 3-1 असा निकाल लागला आहे.

पुढील निवडणुकीत संघटना चारही जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.नवनिर्वाचित अध्यक्ष यश डबास यांनी आपल्या प्राधान्यक्रमाबाबतही माहिती दिली. विद्यार्थ्यांची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले. सत्य निकेतन येथे झालेल्या अलीकडील दुर्घटनेचा संदर्भ देत डबास म्हणाले की, भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्यासोबत अशा प्रकारची घटना घडू नये. त्यामुळे प्रत्येक कॉलेज, हॉस्टेल आणि PG म्हणजेच पेइंग गेस्टची सुरक्षा तपासणी (सेफ्टी ऑडिट) करणे ही आपली पहिली प्राथमिकता असेल.

DUSU ELECTION RESULTS 2026
Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

सचिव आणि संयुक्त सचिवपदही ABVPकडे अध्यक्षपदासोबतच सचिव आणि संयुक्त सचिवपदावरही ABVPच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. ABVPच्या छाबडी यांनी विजय मिळवला.

उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय

दरम्यान, या निवडणुकीतील सर्वात मोठा उलटफेर उपाध्यक्षपदाच्या निकालात पाहायला मिळाला. विविध विद्यार्थी संघटनांच्या उमेदवारांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत अपक्ष उमेदवार दीपांशु शौकीन यांनी विजय मिळवला. दीपांशु शौकीन यांना तब्बल 30,634 मते मिळाली. मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चार प्रमुख पदांपैकी तीन पदे जिंकत ABVPने DUSU निवडणुकीत आपली संघटनात्मक उपस्थिती कायम ठेवली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या परिसरात समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. ढोल-नगाऱ्यांच्या तालावर विद्यार्थी नाचताना आणि गुलाल उधळताना दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com