Arjun Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Arjun Kapoor: रब राखा! मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुनने 'त्या' खास व्यक्तीसाठी काढला टॅटू, कोण आहे ती?

Arjun Kapoor Tattoo : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने नुकताच खांद्यावर एक खास टॅटू काढला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Shreya Maskar

सध्या बॉलिवूड गाजवणारा अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) त्याच्या चित्रपटामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या त्याचा 'सिंघम अगेन' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

अलिकडेच अर्जुनने आपला ब्रेकअप झाला असून आता मी सिंगल असल्याचा खुलासा केला आहे. अशात मलायका अरोरासोबतच्या (Malaika Arora) ब्रेअकपनंतर चर्चेत असलेला अर्जुन कपूर नुकताच एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. अर्जुनने आपल्या खांद्यावर एक खास टॅटू काढला आहे.

अर्जुन कपूरने काढलेला हा खास टॅटू त्याच्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्तीसाठी आहे. अर्जुनने हा टॅटू त्याची दिवंगत आई मोना शौरी कपूर यांच्या स्मरणार्थ काढला आहे. टॅटूमध्ये त्याने 'रब राखा' असे लिहिलं आहे. इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करून त्याने आपल्या आईसाठी खूप भावनिक पोस्ट लिहिली आहे.

अर्जुन कपूरची पोस्ट

"रब राखा - देव तुमच्या पाठीशी आहे. माझी आई नेहमी हे वाक्य चांगल्या आणि वाईट काळात म्हणायची. आजही असं वाटतं की ती माझ्यासोबतच आहे, मला मार्गदर्शन करत आहे, माझ्यावर लक्ष ठेवत आहे. 'सिंघम अगेन' रिलीज होण्याच्या आधी मला हा टॅटू मिळाला आणि आता मी आयुष्याच्या नव्या टप्प्यावर उभा असताना मला असे वाटते की, तिने माझी पाठ थोपटली आहे आणि युनिव्हर्सची एक माझ्यासाठी काही खास योजना आहे. आई याची मला पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल आणि विश्वास दिल्याबद्दल खूप धन्यवाद. रब राखा, नेहमी..." अर्जुनच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India's Got Talentच्या मंचावर शहनाज गिलला आली सिद्धार्थ शुक्लाची आठवण, रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

Breakfast Tips: कमी वेळ अन् हेल्दी नाश्ता; सकाळच्या घाईगडबडीत बनवा 'हे' पदार्थ, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाकडून भाजपच्या आमदाराच्या हत्येची सुपारी; अंबादास दानवेंनी फोडला बॉम्ब

Flight Rules: गुड न्यूज! DGCA ने तिकिटासंदर्भात आणले नवीन नियम, विमान प्रवाशांना होणार मोठा फायदा; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT