Arjun Kapoor  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Arjun Kapoor : अर्जुनने केला मलायकासोबतच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब, ६ वर्षांचं नातं संपलं

Arjun Kapoor Breakup With Malaika Arora: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या आणि मलायकाच्या नात्यासंबंधित मोठा खुलासा केला आहे. अर्जुन नेमकं काय बोलला जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले कपल म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. या दोघांना कायमच आपल्या नात्यामुळे ट्रोल करण्यात येते. मात्र आता मलायका आणि अर्जुनचा (Arjun Kapoor) ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. मात्र आता अर्जुन कपूरने यावर शिक्कामोर्तब केला आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर 2018 पासून एकत्र होते.

अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका (Malaika Arora) अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांनी तब्बल सहा वर्ष एकमेकांना डेट केले आणि आता ते वेगळे झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिवाळी कार्यक्रमात 'सिंघम अगेन'ची टिम आली होती. तेव्हा लोकांशी बोलतानाचा अर्जुन कपूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शेट्टी , अजय देवगण, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ या कार्यक्रमाला आले होते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अर्जुन कपूरच्या शेजारी मनसे प्रमुख राज ठाकरे उभे असताना दिसत आहेत. तेव्हा अर्जुन कपूरने लोकांशी बोलताना मलायका आणि आपल्या ब्रेकअपची गोष्ट सांगितली आहे.

तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, अर्जुनने हातात माईक घेताच सर्वजण मलायकाचे नाव घेत ओरडू लागले होते. तेव्हा अर्जुन "मी आता सिंगल आहे" असे मोठ्याने म्हणाला. पुढे अर्जुन म्हणाला की, माझी ओळख टॉल व हँडसम अशी करून दिली म्हणून वाटले लग्नाबाबत बोलणार आहात. त्यानंतर अर्जुनने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

अर्जुन कपूर आता सिंघम अगेनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याने खलनायिकाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT