Anupam Kher Thiland Viral Video Twitter
मनोरंजन बातम्या

Anupam Kher In Thiland: परदेशातील रस्त्यावर शिव- पार्वती पाहून अनुपम खेर गहिवरले; खास पोस्ट शेअर करत दाखवले नॅशनल हायवेवरील दृश्य...

Anupam Kher Thiland Viral Video: दमदार अभिनयामुळे चर्चेत राहिलेले अनुपम खेर सध्या परदेशवारी करण्यात व्यग्र आहे.

Chetan Bodke

Anupam Kher Thiland Video: बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर कधी आपल्या वादग्रस्त विधानांनी तर कधी आपल्या सोशल पोस्टमुळे नेहमीच चर्चेत राहतात. नेहमीच आपल्या अभिनयाने चर्चेत राहिलेले अनुपम खेर सध्या आपल्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. सध्या ते परदेशात सफर करण्यात व्यग्र आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ बराच चर्चेत आला आहे.

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर थायलंडमधील बँकॉकमध्ये फिरताना दिसत आहे. नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओत अनुपम खेर थायलंडच्या रस्त्यावर फिरत असून त्यांनी आपल्या चाहत्यांना तिथल्या रस्त्यावरील काही दृष्य देखील दाखवत आहेत. त्यांनी हा व्हिडीओ नुकताच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला असून यावेळी त्यांनी भारतीय देवदेवतांचे दर्शन आपल्या चाहत्यांना केले. (Bollywood Actor)

या एक मिनिटांच्या व्हिडीओत अनुपम खेर म्हणतात, “मित्रांनो, भारताच्या देवी-देवतांचे, भारताच्या परंपरेचे आणि भारताच्या संस्कृतीचे अस्तित्व संपूर्ण जगभरात आहे. त्याचे महत्त्व काय आहे, हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. थायलंडमधील बँकॉक शहरातील एका महामार्गावर रस्त्याच्या कडेला शंकर, पार्वती आणि गणपतीची मूर्ती आहे. हे पाहून मी भारावून गेलो आहे. जय शिव शंभो!” असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला.

सोबतच अनुपम खेर यांनी या व्हिडीओला कॅप्शन देत शेअर केले, “थायलंडच्या नॅशनल हायवेवर शंकर देव, माता पार्वती, गणपती बाप्पांची भव्य दिव्य मूर्ती पाहणे ही एक विलक्षण अनुभूती होती! कित्येकदा आपल्याला त्यांचे दर्शन घेता येत नाही. पण देवाचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठी असतो. भोलेनाथ, ओम नमः शिवाय.”

सध्या अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Latur: मिरवणुकीदरम्यान बैल अचानक उधळला, ग्रामस्थ सैरावैरा पळू लागले; VIDEO व्हायरल

Pimpari-Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत, ७ कुत्र्यांचा तरुणावर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

Beed Crime: संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळला, तरुणाने आयुष्य संपवलं; बीडमध्ये खळबळ

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच आयुष्य संपवलं, आता आला मोठा ट्विस्ट; न्यायाधीशावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT