Anil Kapoor Birthday: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर नेहमी आपल्या अभिनयासह त्याच्या स्पेशल आऊटफिटमुळे चर्चेत कायम असतो. आजही त्याचे चाहते अभिनयासोबतच आऊटफिटचेही कौतुक करतात. अनिल कपूरचा वर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरातही आहे, अनिलने अभिनयाची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतूनच केले होती.
अनेकदा बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटांचा वाद अनिल समोर अनेकदा झाला होता. अनिलने 35 वर्षांपूर्वी 1987 मध्ये एका मुलाखतीत या विषयावर भाष्य केले होते.
गेल्या काही दिवसांपूर्वीच अनिलने एका चर्चासत्रात भाग घेतला होता. त्या दरम्यान तो बोलतो, 'दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी विरुद्ध बॉलिवूड अशी चर्चा झाली होती. सोबतच साऊथमधील कलाकारांचा चाहतावर्गही बराच मोठा आहे.
तसा चाहता वर्ग आता बॉलिवूड कलाकारांचा नाही राहिला. मी कधीच इतका खोलवर विचार करत नव्हतो, पण आता विचार करायची खरंच वेळ आली आहे. या विषयासाठी मी नक्कीच योग्य व्यक्ती नाही.'या चर्चेदरम्यान अनिलने दाक्षिणात्य चित्रपट विरुद्ध बॉलिवूड चित्रपट या विषयावर बोलणं त्याने टाळले आहे.
पण 35 वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्याने या विषयावर आपले मत मांडले होते. तेव्हा तो बोलला होता की, 'बॉम्बेमध्ये असे लोक आहेत जे दाक्षिणात्य चित्रपटांकडे तुच्छतेने पाहतात, पण एका प्रकारे तुम्ही म्हणू शकता की साऊथच्या चित्रपटांनी भारतभर अनेक चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. त्या चित्रपटांच्या चाहत्यांची संख्या आता हळू हळू वाढत आहे.
सोबतच अनिल कपूर पुढे बोलतो, 'लोक भलेही साऊथच्या चित्रपटांची खिल्ली उडवत असतील, पण त्यांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. आज ज्याप्रकारे साऊथचे चित्रपट देशावर राज्य करत आहेत. दक्षिणात्य चित्रपट आशय आणि विषय हा फारच वेगळा आहे. ते मूलभूत चित्रपट बनवतात, परंतु देशातील निरक्षर लोकांनाही समजण्यासारखे चित्रपट बनवतात.'
यावेळी चर्चेत अनिल कपूरसोबतच आयुष्मान खुराना, राजकुमार राव असे कलाकार होते. त्याचवेळी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून ऋषभ शेट्टी आणि दुल्कर सलमान यांनीही सहभाग घेतला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.