Pathaan Controversy: 'पठान'वादावर आशा पारेख स्पष्टच बोलल्या, 'स्वत:ला पुरोगामी विचाराचे म्हणतात ना?...' म्हणत केली नेटकऱ्यांवर टीका...

गाण्यामधील दीपिकाच्या बिकीनीवरुन सुरू झालेला वाद चांगलाच तापला आहे. हा वाद सध्या तरी संपायचे नाव घेत नाही.
Pathaan Controversy In Asha Parekh
Pathaan Controversy In Asha ParekhSaam Tv
Published On

Pathaan Controversy: गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. गाण्यामधील दीपिकाच्या बिकीनीवरुन सुरू झालेला वाद चांगलाच तापला आहे. या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणीही अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी केली आहे. त्यामुळे चित्रपटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर आता बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी नेटकऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

Pathaan Controversy In Asha Parekh
Malaika Arora: मलायकाच्या लेकाची शोमध्ये हजेरी, कपड्यावरुन लेकानेही आईला झापले...

माध्यमांसोबत बोलताना आशा पारेख यांनी 'पठान' चित्रपटातील वादावर प्रतिक्रिया देत म्हणाल्या, "चित्रपटात अभिनेत्रीने घातलेल्या बिकिनीवर कुठेच गोंधळ होत नाही, इथे अभिनेत्रीच्या बिकिनीच्या रंगावरून गोंधळ घातला जातो. मला असे वाटते की, नागरिकांचा मेंदू हळूहळू बंद होत आहे आणि बदलत्या काळानुसार आपण खूप लहान होत चाललो आहोत."

Pathaan Controversy In Asha Parekh
Anil Kapoor's Birthday: सोनमनं वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, नातवासोबतच्या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले

सोबतच त्या पुढे म्हणतात, "नेहमीच प्रत्येक जण येऊन बॉलिवूडला कोणत्याही मुद्द्यावरुन ट्रोल करुन जातं. एकीकडे आपण पुरोगामी असल्याच्या गप्पा मारतो, पण दुसरीकडे बिकिनीच्या रंगावरून वाद निर्माण करत आपल्या विचारांची पातळीही दाखवून देतो."

Pathaan Controversy In Asha Parekh
Amitabh Bachchan: बिग बींना आयुष्यात उंचीच नडली, हॉटसीटवरील स्पर्धकासमोर व्यक्त केली खंत...

हिंदू संघटनांसोबतच अनेक नेत्यांनीही या वादात उडी मारली होती. सर्वप्रथम मध्यप्रदेश सरकारचे मंत्री असलेल्या नरोत्तम मिश्रा यांनी अभिनेत्रीच्या बिकिनीवर प्रश्न उपस्थित केला होता. याला भ्रष्ट मानसिकता म्हणत गाण्यातील दृश्य काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली होती.

विशेष म्हणजे शाहरुखचा 'पठान' हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, मात्र रिलीजपूर्वीच चित्रपटातील सीन आणि गाण्यांवरून गदारोळ सुरू आहे. यावेळी शाहरुखने चित्रपटावरुन झालेल्या वादावरही आपल्या थोडक्यात प्रतिक्रिया दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com