Badass Ravikumar Poster Instagram/ @realhimesh
मनोरंजन बातम्या

Badaas Ravi Kumar: हिमेशच्या नव्या चित्रपटाची चर्चा, समीक्षकांकडून टीझरची उडवली खिल्ली

हिमेशने त्याच्या 'बॅडएस रवीकुमार' या नव्या चित्रपटाची घोषणा टीझरच्या माध्यमातून केली. घोषणेनंतर सोशल मीडियावर हिमेश रेशमियाच्या चित्रपटाची खिल्ली उडवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Badaas Ravi Kumar Teaser: आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनाला भूरळ घालणाऱ्या प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाने पुन्हा एकदा चित्रपटात पदार्पण केले आहे. त्याने गुरुवारी त्याच्या 'बॅडएस रवीकुमार' या नव्या चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट त्याचा 'द एक्स्पोज' चा स्पिन ऑफ चित्रपट असणार आहे. हिमेश रेशमिया या चित्रपटात रवीकुमारचे पात्र साकारत आहे. 'बॅडएस रवी कुमार'चा टीझर रिलीज करून चित्रपटाची घोषणा केली. टीझरमध्ये हिमेश रेशमियाचा अॅक्शन अवतार दिसत आहे.

स्वत:ला अभिनेता आणि चित्रपट समीक्षक म्हणवणाऱ्या केआरकेने (कमल आर खान) हिमेश रेशमियाच्या नवीन चित्रपटावर ताशेरे ओढले आहेत. त्याने सोशल मीडियावर हिमेश रेशमियाच्या चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. केआरके सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी तो अनेकदा खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. केआरकेने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर हिमेश रेशमियाचा 'बॅड्स रवी कुमार' चित्रपटाची खिल्ली उडवली आहे.

केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'हिमेश रेशमियाच्या बॅडएस रवी कुमारच्या नवीन चित्रपटाची घोषणा. हिमेशने चित्रपटाची कथा लिहिली आहे, हिमेशचे संगीत, हिमेशने दिग्दर्शित केले आहे, हिमेशने निर्मित केले आहे. अभिनेताही हिमेश आणि प्रेक्षकही हिमेश.' केआरकेचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्विटवर अनेक सोशल मीडिया यूजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत.

बॅडएस रवी कुमार या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर यावेळी हिमेश डबल अॅक्शन करताना दिसणार आहे. यासोबतच त्याचे धमाकेदार संवाद आणि आकर्षक संगीत ही त्याची सिग्नेचर स्टाइलही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हिमेश प्रेक्षकांसाठी उत्तम गाण्यांसोबतच अभिनयही देत असतो. २००८ साली हिमेशने ऋषि कपूरच्या 'कर्ज' चित्रपटाचा रिमेक केला होता जो बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.

त्यानंतर त्याने स्वतःच्याच एका हिट गाण्याच्या अल्बमच्या नावाने एक नाही दोन चित्रपट काढले ते म्हणजे 'तेरा सुरूर' आणि 'आप का सुरूर'. हे दोन्ही चित्रपट सुद्धा सुपरफ्लॉप ठरले. तरीही हिमेशने 'दमादम', 'कजरा रे', 'रेडियो' सारख्या फ्लॉप चित्रपटांची मालिका कायम ठेवली. त्याच्या 'खिलाडी ७८६' आणि 'द एक्स्पोज' या दोन चित्रपटांना चांगल्या प्रमाणात यशप्राप्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT