Boney Kapoor Movie Update: चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचा 'मिली' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट त्यांच्यासाठी खूप खास आहे कारण यात त्यांची मुलगी जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जान्हवी कपूरचा हा पहिलाच चित्रपट आहे, ज्याची निर्मिती वडील बोनी कपूर करत आहेत.
मुलगा अर्जुन कपूर आणि मुलगी जान्हवी कपूर यांना बोनी कपूर यांनी लॉन्च केले नव्हते. चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी त्यांचे भाऊ अनिल कपूर आणि संजय कपूर यांना त्यांच्या चित्रपटातून पहिली संधी दिली होती. याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, 'भावांना लॉन्च करण्यासाठी मी पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण जान्हवी आणि अर्जुनच्याबाबतीत मला तसे करायचे नव्हते'.
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान, बोनी कपूर यांना विचारण्यात आले की त्यांनी त्यांची मुले अर्जुन कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांचा पहिला चित्रपट का निर्मित केला नाही. यावर बोनी कपूर यांनी सांगितले की हा त्यांचा निर्णय होता. ते म्हणाले, 'मी अनिल आणि नंतर संजयला लॉन्च केले होते आणि मला तेव्हा रोखणारे कोणी नव्हते. मी साखरेमध्ये गूळ मिसळत राहिलो आणि साखरेत इतका गूळ मिसळला की मधुमेहाचा धोका निर्माण झाला. मी माझ्या भावांना लाँच केले आणि त्यात कोणतीही कसर ठेवली नाही. पाण्यासारखा पैसा ओतला. पण मी ठरवलं की माझ्या मुलांना कोणीतरी लॉन्च करावं. ते तयार झाल्यावर मी त्यांच्या बाजारमूल्यानुसार त्यांना पैसे देईन'. (Bollywood)
'ही आमची रणनीती होती. भाऊ अनिल आणि संजय लॉन्च करण्यासाठी मी खूप पैसे गुंतवले कारण त्यांचे आणि माझे भावनिक नाते होते . पण अर्जुन आणि जान्हवीसोबत अशी चूक मला करायची नव्हती. माझी इच्छा होती की आधी त्यांना त्यांच्या प्रतिभेनुसार चित्रपट मिळावेत, जेव्हा ते स्थिर होतील तेव्हा मग त्यांच्यावर पैसे गुंतवू. मला अपेक्षा आहे की 'मिली' चित्रपटानंतर जान्हवीला चांगल्या अभिनेत्रीचा टॅग मिळेल'.
बोनी कपूरचा यांचा मुलगा अर्जुन कपूरने आदित्य चोप्राच्या 'इशकजादे' या चित्रपटातून पदार्पण केले होते, तर जान्हवीने करण जोहरच्या 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांची दुसरी मुलगी खुशी कपूरही झोया अख्तरच्या 'द आर्चिज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Movie)
बोनी कपूरची निर्मिती असलेल्या 'वो सात दिन'मधून अनिल कपूरला 1983 मध्ये लॉन्च केले होते, तर संजयने 1995 मध्ये 'प्रेम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अनिल कपूर यापूर्वी छोट्या-मोठ्या भूमिका चित्रपटांमध्ये साकारल्या होत्या. परंतु पद्मिनी कोल्हापुरे आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत 'वो सात दिन'मध्ये अनिल पहिल्यांदाच प्रमुख अभिनेते म्हणून दिसले होते. संजय बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.