Ali Fazal  Instagram @alifazal9
मनोरंजन बातम्या

Ali Fazal on 'Fukrey 3': 'फुकरे 3'मधून अली फजलचा पत्ता कट, अभिनेत्यानेच सांगितले चित्रपटामध्ये न दिसण्याचे कारण

'फुकरे'चा भाग असलेला अभिनेता अली फजल पोस्टर्समध्ये दिसत नसल्याने अली फजलचे चाहते निराश झाले आहेत.

Pooja Dange

Ali Fazal is not playing Jafar in 'Fukrey 3': 'फुकरे'च्या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या फर्स्ट लूकचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठी, रिचा चढ्ढा, वरुण शर्मा, पुलकित सम्राट आणि मनजोत सिंग यांची झलक पाहायला मिळत आहे. पण या पोस्टर्समध्ये 'फुकरे'चा भाग असलेला अभिनेता अली फजल दिसत नाही. यामुळे अली फजलचे चाहते काहीसे निराश झाले आहेत.

अली फजल या चित्रपटाचा भाग का नाही, असा प्रश्न सतत चाहते विचारत आहेत. आता या चित्रपटाच्या शेवटच्या दोन भागात जफर भाईची भूमिका करणाऱ्या अली फजलने यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

अली फजलने एका मुलाखतीदरम्यान असे काही सांगितले की, 'मिर्झापूर' या वेबसीरीजच्या पुढील भागामुळे तो 'फुकरे 3'मध्ये दिसणार नसल्याचे सांगितले आहे. अली म्हणाला, "जफरभाई येणार की नाही? प्रत्येकजण हा प्रश्न सतत विचारत असतो. माफ करा मित्रांनो, यावेळी नाही. जफरभाईला कधी कधी गुड्डू भैय्या व्हावं लागतं आणि दोन ब्रह्मांडं कधी कधी ओव्हरलॅप होतात. जे एकदा फुकरे, तो नेहमी फुकरा बनून राहिला... म्हणूनच मी आजूबाजूला आहे. परंतु फुकरे, भोली आणि पंडितजींची यांच्या तिसऱ्या आऊटिंगसोबत येत नाहीये."

अली पुढे म्हणाला, "मला तिसर्‍या भागाचा भाग व्हायचे होते, पण वेळ आणि वेळापत्रकाने परवानगी देत नाही. मी भविष्यात कधीतरी परत येईन. कदाचित तुमच्या अपेक्षेपेक्षा लवकर. एक छोटीस फेरफटका मारून जफर तुमच्या मनोरंजनासाठी परत येईल."

अली फजल लोकप्रिय वेबसीरीज 'मिर्झापूर'मध्ये गुड्डू पंडितची भूमिका साकारत आहे. या मालिकेचा पुढील भाग यावर्षी OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे.

'फुकरे ३' बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाचे दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा आहेत. या चित्रपटात पंकज त्रिपाठी- पंडित, भोली पंजाबनच्या भूमिकेत रिचा चढ्ढा, चुचाच्या भूमिकेत वरुण शर्मा, हनीच्या भूमिकेत पुलकित सम्राट आणि लालीच्या भूमिकेत मनजोत सिंग दिसणार आहेत.

हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच, चित्रपटाची निर्मिती कंपनी एक्सेल एंटरटेनमेंटने चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित केले आहेत, ज्यामध्ये "इस बार होगा चमत्कार स्ट्रेट फ्रॉम जमनापार."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tourism : पाऊस, समुद्रकिनारा अन् गरम चहा; मुंबईतील 'हे' प्रसिद्ध ठिकाण, जेथे असते दिवसरात्र गर्दी

Thackeray Brothers : ठाकरेंचं ठरलं का? दसरा मेळाव्यात युतीचं तोरण बांधणार का? शिवाजी पार्कवर राज ठाकरे विचारांचं सोनं लुटणार का?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

Toyota Cars Offers: अंबाबाईच्या नावानं चांगभलं! फक्त ९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये घरी आणा कार, अन् ५ फ्री सर्विससह ४ धमाकेदार फायदे

SCROLL FOR NEXT