Akshay Kumar Tests Positive For Covid 19 Saam TV
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Detect Covid 19 : अभिनेता अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण, डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली घेतोय उपचार

Akshay Kumar Tests Positive For Covid 19 : अभिनेता अक्षय कुमारला कोव्हिड १९ ची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. कोरोनामुळे अभिनेता अनंत- राधिकाच्या लग्नाला उपस्थित राहणार नाही.

Chetan Bodke

सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'सरफिरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या त्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. पण अशातच तो त्याच्या हेल्थमुळेही चर्चेत आला आहे. अभिनेता अक्षय कुमारची कोव्हिड १९ ची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे अभिनेता अनंत- राधिकाच्या लग्नाला उपस्थित राहणार नाही.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारची गेल्या दोन दिवसांपासून तब्येत ठीक नव्हती. 'सरफिरा'मुळे अभिनेता प्रमोशनमध्ये व्यग्र होता. प्रमोशन दरम्यानच अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली होती. तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे अभिनेत्याने कोरोनाची चाचणी केली होती. त्यामध्ये अभिनेत्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे, अभिनेत्याने स्वत:ला क्वारंटाईन करून ठेवले आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्वच खबरदारी सध्या तो घेत आहे.

डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली सध्या अभिनेत्यावर उपचार सुरू आहेत. नुकतीच अभिनेत्याची कोव्हिडची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तो होम क्वारंटाईन आहे. अभिनेत्याला आज होणाऱ्या राधिका- अनंत यांच्या लग्नाचं आमंत्रणही आलं होतं. पण आता अभिनेता या लग्नाला उपस्थिती लावणार नाही. अक्षयला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. २०२० मध्ये पहिल्यांदा अभिनेत्याला कोरानाची लागण झाली होती. तर दुसऱ्यांदा २०२२ मध्ये झाला होता. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. आता तिसऱ्यांदा 'सरफिरा'च्या प्रमोशन दरम्यान झालेली आहे.

अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला 'सरफिरा' चित्रपट आज (१२ जुलै) रिलीज झाला आहे. चित्रपट रिलीज होताच चाहत्यांमध्ये चित्रपटाची जोरादार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये, चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांनी पाचपैकी चार स्टार दिले आहेत. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, अक्षय कुमारसह राधिका मदान, सीमा बिस्वास, परेश रावल आणि जय उपाध्याय अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT