Abhishek Bachchan In Chala Hawa Yeu Dya Saam Tv
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan In CHYD: मिसळचा बेत अन् दादा कोंडकेंच्या चित्रपटांची मेजवाणी! 'चला हवा येऊ द्या'मध्ये रंगला हास्य कल्लोळ, Video Viral

Ghoomer Promotion Abhishek Bachchan In CHYD: अभिषेक बच्चनसोबत सैयामी खेर देखील ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहे.

Chetan Bodke

Abhishek Bachchan In Chala Hawa Yeu Dya: नुकताच अभिषेक बच्चनचा बॉक्स ऑफिसवर ‘घूमर’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनेक वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर अभिषेक बच्चन रुपेरी पडद्यावर पुन:रागमन करीत आहे. अखेर ओटीटीनंतर अभिषेकचा आता थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

१८ ऑगस्ट रोजी अभिषेकचा ‘घूमर’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिषेक बच्चनसोबत चित्रपटात प्रमुख भूमिकेत सैयामी खेर देखील दिसणार आहे. सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र असून नुकतेच त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहे.

अभिषेकने प्रमोशन दरम्यान अनेक कार्यक्रमांना आणि टिव्ही शोला भेटी दिल्या आहेत. अभिषेक या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मराठी मनोरंजन विश्वातला लोकप्रिय टिव्ही शो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये त्याने हजेरी लावली आहे. या शो आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

फार मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूड सेलिब्रिटी आल्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अभिषेकने प्रमोशनमध्ये स्पेशल झणझणीत मिसळवर ताव मारला होता. सध्या अभिषेकच्या एपिसोडचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिषेकने प्रमोशन दरम्यान, त्याला मामलेदारची मिसळ फार आवडते, असे सांगितले होते. त्याला मिसळ खूपच आवडत असून तो नेहमीच मिसळ खातो. यावेळी निलेशने अभिषेकला बिग बी पण मिसळ खातात का ? असा प्रश्न विचारला होता. त्यावर अभिषेक म्हणाला की, “नाही, नाही, आमच्या घरी सगळी मिसळ मीच एकटा खातो, त्यामुळे घरातल्यांना काहीच उरत नाही.”

सोबतच यावेळी अभिषेकने मिसळवर ताव मारल्यानंतर सैराटच्या झिंगाट गाण्यावर भन्नाट डान्सही करताना दिसला. यावेळी त्याने त्याला, लहानपणी दादा कोंडकेचे चित्रपट फार आवडायचे, असा खुलासाही त्याने केला. अभिषेकचा ‘चला हवा येऊ द्या’मधील धमाकेदार एपिसोड येत्या २१ ऑगस्ट रोजी झी मराठीवर प्रदर्शित होणार आहे.

अभिषेक बच्चनच्या ‘घूमर’बद्दल बोलायचे तर, येत्या १८ ऑगस्ट रोजी ‘घूमर’ चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अभिषेक बच्चन चित्रपटात क्रिडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बल्की करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT