Abhishek Bachchan Birthday Saamtv
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan: चित्रपट फ्लॉप, पण कमाईत सगळ्यांचा बाप! अभिषेक बच्चनच्या संपत्तीचे आकडे पाहून व्हाल थक्क

चित्रपट फ्लॉप ठरत असतानाही अभिषेक बच्चन कमाईच्या बाबतीत मात्र बिग बींच्याही पुढे आहे.

Gangappa Pujari

Abhishek Bachchan Birthday: अभिषेक बच्चन हा हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या अनेक दमदार भूमिकांनी अभिषेकने बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. आज (५, फेब्रूवारी) अभिनेता अभिषेक बच्चनचा वाढदिवस..

सिने जगतात फारसे यश मिळवले नसले तरी अभिषेक बच्चन करोडो संपत्तीचा मालक आहे. जाणून घेवूया, अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती.. (Latest Marathi News)

अभिनेता अभिषेक बच्चन 5 फेब्रुवारीला आपला ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेक बच्चनने 2000 मध्ये 'रिफ्युजी' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. फ्लॉप पदार्पणानंतरही अभिषेकने हिंमत हारली नाही आणि जे काही चित्रपट मिळाले त्यामध्ये तो भूमिका करत राहिला.

मात्र एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट दिल्याने अभिषेक बच्चनवर फ्लॉप अभिनेता असा शिक्काही बसला होता.

अभिषेकची एकूण संपत्ती...

अभिषेक बच्चनकडे करोडोची संपत्ती आणि महागडे कार कलेक्शन आहे, ज्याकडे अनेक आलिशान कार आहेत. 'सीए नॉलेज'च्या रिपोर्टनुसार,रिपोर्टनुसार अभिनेत्याची नेटवर्थ जवळपास २८ मिलियन आहे. अभिषेक एका महिन्याला तब्बल २ कोटी रुपये कमावतो.

तो चित्रपटांपेक्षा (Bollywood) खेळामध्ये जास्त रस दाखवत आहे. अभिषेक बच्चन हा अभिनेत्याबरोबरच चांगला बिझनेसमनदेखील आहे. त्याच्याकडे सध्या दोन यशस्वी क्रीडा संघ आहेत. या संघांपैकी एक प्रो कबड्डी आहे, ज्याचे नाव पिंक पँथर्स आहे आणि दुसरा फुटबॉल संघ चेन्नईयिन एफसी आहे. या संघाने इंडियन सुपर लीग दोनदा जिंकली आहे.

आलिशान कार कलेक्शन...

अभिषेक बच्चनला महागड्या वाहनांचाही शौक आहे, 5 आलिशान बंगल्यांव्यतिरिक्त, त्याच्याकडे अनेक महागड्या कार आहेत. अभिषेककडे ऑडी ए8एल, मर्सडीज बेंझ, एसएल ३५० डी, मर्सडीज बेंझ एएमजेड यांसारख्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कन्नड नगर परिषदेची दुमजली इमारत कोसळली

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

Late Night Awake: तुम्हालाही रात्री उशिरा पर्यंत जाग राहण्याची सवय आहे? वेळीचं व्हा सावधान नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

Mumbai Local: लोकलमधून प्रवासी पडला अन्...; हार्बरची सेवा विस्कळीत|VIDEO

SCROLL FOR NEXT