Raosaheb Danve
Raosaheb DanveSaam tv

Raosaheb Danve: मंत्री दानवेंचा हटके लुक..सोशल मिडीयावर फोटो व्‍हायरल; नेटकरी म्‍हणतायेत वेलेंटाइन स्पेशल टूर का?

मंत्री दानवेंचा हटके लुक..सोशल मिडीयावर फोटो व्‍हायरल; नेटकरी म्‍हणतायेत वेलेंटाइन स्पेशल टूर का?
Published on

जालना : केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हे नेहमीच आपल्या हटके अंदाजाने या ना त्या कारणाने चर्चेत असतात. मंत्री दानवेंचे (Raosaheb Danve) असेच काही फोटो सध्‍या सोशल मिडीयावर (Social Media) व्‍हायरल होत आहे. या व्‍हायरल फोटोंमुळे दानवे हे वेगळ्या चर्चेत आहेत. (Maharashtra News)

Raosaheb Danve
Crime News: लहान मुलाने दुचाकीला सायकल आडवी केल्‍याने वाद; तरुणाची हत्या

कधी पत्नीसोबत शेतावर बखर तर कधी चुलीवर भाकरी करतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातून एक रांगडा नेता म्हणून त्याची ओळख ही सर्व श्रुत आहे. सध्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पत्नी निर्मला दानवे यांच्यासह दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. याचं दौऱ्यानिमित्ताने या सुंदर जोडप्यांची फोटो सोशल मीडियावर हटके अंदाजात व्हायरल होत आहेत.

वैलेंटाइन स्पेशल टूर का?

मतदार संघातून त्यांच्या चाहत्यांची ही या फोटोंना मोठी पसंती मिळतं आहे. त्यातच १४ फेब्रुवारी हा वैलेंटाइन डे जवळ येत आहे. त्यात ही जोडप्याची व्हायरल होणारी फोटो पाहून नेटकरी त्यांना वैलेंटाइन स्पेशल टूर का? असं म्हणून प्रश्न विचारत आहे. त्यामुळे जालन्यातील फेब्रुवारी महिन्यात वैलेंटाइन डे स्पेशल जोडपं म्हणून ही त्यांची चर्चा होवू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com