Aamir Khan Met Raj Thackeray Saam TV
मनोरंजन बातम्या

Amir Khan : अभिनेता आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला; काय आहे कारण?

आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं बोललं जातंय

साम टिव्ही ब्युरो

Aamir Khan Met Raj Thackeray : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा सध्या अडचणीत जात आहे. कारण आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal singh chaddha) हा चित्रपट अपयशी ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अतिशय थंड प्रतिसाद मिळत आहेत. रिलीज होताच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. दरम्यान, आमिर चित्रपटामुळे सध्या डिप्रेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच, या कठीण काळात त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट देखील घेतली असल्याचं बोललं जातंय. (Aamir Khan New Movie)

आमिर खान मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेला असल्याची माहिती आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नुकताच रिलीज झाला. हा चित्रपट हॉलिवूड फिल्म ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे. आमिर खान या चित्रपटात एका शिखाच्या भूमिकेत आहे. मानसिक दृष्टया फिट नसलेल्या व्यक्तीचा रोल आमिरने निभावला आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ ला अतिशय थंड प्रतिसाद मिळाल्याने आमिरला जबर धक्का बसला. यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला आहे, तो कुणाचेही फोन उचलत नाहीये. अशी माहिती त्यांच्या जवळच्या मित्राने दिली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊनही, विकेंडमध्ये चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला. विशेष बाब म्हणजे चार पाच दिवसांची सुट्टी असून सुद्धा प्रेक्षकांनी चित्रपटाला म्हणावं तसा प्रतिसाद दिला नाही. (Aamir Khan Movies)

दरम्यान, या कठीण काळात आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. आमिर खान आज दुपारी चारच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आमिर जवळपास तासभर शिवतीर्थावर असल्याचं वृत्त आहे. राज ठाकरे नवीन इमारतीत रुजू झाल्यापासून विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या नवीन घराला भेट दिल्याचे समोर आलं. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी आमिर खानच्या शिवतीर्थ भेटीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई, 34 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, ५ जणांना अटक

SCROLL FOR NEXT