Rakul Preet Singh And Jackky Bhagnani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakul Preet-Jackky Wedding: लग्नामध्ये रकुल प्रीतला सरप्राईज देणार जॅकी भगनानी, होणाऱ्या पत्नीसाठी खूपच खास आहे हे गिफ्ट

Rakul Preet And Jackky Bhagnani: लग्नाच्या दिवशी जॅकी त्याच्या लेडी लव्हसाठी एक सुंदर परफॉर्मन्स देणार आहे. तिच्यासाठी तो एक गाणं गाणार आहे. जॅकीचे हे सरप्राईज रकुल प्रीतसाठी खूपच खास असणार आहे.

Priya More

Rakul Preet And Jackky Bhagnani Wedding Update:

बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतील सर्वांचे आवडते आणि चर्चेत असलेले कपल म्हणजे रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani). चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे कपल लवकरच लग्न करणार आहे. येत्या २१ फेब्रुवारीला गोव्यामध्ये रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा शाहीविवाह सोहळा पार पडला आहे.

गोव्यामध्ये सध्या त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना देखील सुरुवात झाली आहे. रकुल-जॅकीच्या लग्नासाठी (Rakul Preet-Jackky Wedding) बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी देखील गोव्यामध्ये दाखल झाले आहेत. रकुल आणि जॅकीच्या लग्नाबाबत दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. अशामध्ये लग्नामध्ये जॅकी भगनानी होणारी पत्नी रकुल प्रीतला खास गिफ्ट देणार आहे. सध्या या गिफ्टची जोरदार चर्चा सुरू आहे.

जॅकी भगनानी त्याची होणारी पत्नी रकुल प्रीत सिंगला लग्नाच्या दिवशी एक सुंदर सरप्राईज देणार आहे. जे पाहून वधू रकुल प्रीत भावुक होऊ शकते. बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, लग्नाच्या दिवशी जॅकी त्याच्या लेडी लव्हसाठी एक सुंदर परफॉर्मन्स देणार आहे. तिच्यासाठी तो एक गाणं गाणार आहे. जॅकीला त्याची होणारी पत्नी रकुलला एक सुंदर आणि संस्मरणीय भेट द्यायचे होते त्यासाठी त्याने हा गाण्याचा परफॉर्मन्स करण्याचे ठरवले आहे.

जॅकी या गाण्यातून त्याचे आणि रकुलमधील सुंदर नाते आणि प्रवास उलगडणार आहे. जॅकी त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी गाणाऱ्या गाण्याचे टायटल 'बिन तेरे' असे आहे. जे मयूर पुरी यांनी लिहिले आहे. या गाण्याला संगीतकार तनिष्क बाग संगीत देणार आहे. तनिष्क बागने झहरा एस खान आणि रोमी सारख्या कलाकारांसोबत गाणी गायली आहेत.

रकुल प्रीत सिंह आणि जॅकीची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. दोघेही शेजारी होते. पण त्यांना कधीच कळले नाही. मैत्री नव्हती, पण लॉकडाऊन दरम्यान त्यांच्यात एक बॉन्ड तयार झाला आणि दोघांनी डेट करायला सुरुवात केली. रकुल आणि जॅकीने 2021 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर आता या कपलने लग्न करण्याचा निर्णय घेतला. येत्या २१ फेब्रुवारीला रकुल प्रीत कायमची जॅकी भगनानीची होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Disha Salian Case: संजय राऊतांचा नितेश राणेंवर हल्लाबोल; पिक्चर अभी बाकी, नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

SCROLL FOR NEXT