Alia Bhatt Shares her photo  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt: आलियाच्या सनकिसला मस्तानीची कमेंट, फोटो पाहून दीपिका म्हणाली...

आलियाने तिचा मॉर्निग सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Pooja Dange

Alia Bhatt New Photo: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट नुकतीच आई झाली आहे. आलिया तिच्या मुलीची काळजी घेण्यात व्यस्त आहे. यामुळे आलिया सध्या घरी राहणे पसंत करते. नुकताच आलियाने तिचा मॉर्निग सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या फोटो अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने कमेंट केली आहे.

आज सकाळीच आलियाने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे. तिने तिच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप केलेला नाही. सकाळची सोनेरी सूर्यकिरणे तिच्या चेहऱ्यावर पडली आहेत. आलियाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'रविवारी सकाळी खूप प्रकाशाच्या शोधात बिनाकारण बाथरूम फोटोशूट'. तसेच तिने हॅपी संडे असेही म्हटले आहे. (Alia Bhatt)

आलियाने केलेल्या या पोस्टवर चाहत्यांचेय अनेक कमेंट येत आहेत. या कमेंट करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही समावेश आहे. दीपिका पदुकोणने आलियाच्या पोस्टवर "मला अश्वगंधा बाउन्सचा सुगंध का येत आहे?" अशी कमेंट केली आहे. अश्वगंधा बाउन्स हे दीपिका पदुकोणच्या 82°E ब्रँडचे स्किन केअर उत्पादन आहे. नुकतेच दीपिकाने स्वतःच्या ब्रँड अंतर्गत हे उत्पादन लाँच केले आहे. आलियाच्या फोटोंवर तिची आई सोनी राजदानही हिने देखील कमेंट केली आहे. तसेच अभिनेत्री सोनम कपूरने 'बेबी मॉम ग्लो' अशी कमेंट केली आहे. (Celebrity)

आलिया आई झाल्यापासून बाळासोबत राहणं पसंत करते. बाबा रणबीर कपूर देखील 'राहा'साठी सर्व कामे बाजूला ठेवून तिच्याकडे लक्ष देत आहेत. आलिया आणि रणबीर अनेक वर्ष एकमेकांना देत केल्यानंतर यावर्षी १४ एप्रिलला लग्न केले. त्यांनी लग्नाला जवळच्या व्यक्तींनाच बोलावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

Sambhajinagar : प्ले स्कूलमधील निष्काळजीपणाचा कळस! २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत, ६ जणांविरोधात गुन्हा

Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

SCROLL FOR NEXT