Nitin Gadkari Biopic Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

Nitin Gadkari Biopic: ‘हायवे मॅन ’ नितीन गडकरींचं आयुष्य रुपेरी पडद्यावर उलगडणार, ‘गडकरी’ चित्रपटाची घोषणा

Highway Man Nitin Gadkari Film: भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आयुष्य जनतेला रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.

Chetan Bodke

Nitin Gadkari Biopic Announcement

भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आयुष्य जनतेला रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. देशातील बड्या राजकारण्यांपैकी एक नेता म्हणून नितीन गडकरी यांची ओळख. सक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्त्व, सडेतोड भूमिका, नव्या भारतासाठी दूरदृष्टी ठेवून धडाकेबाज निर्णय घेणारे राजकारणी नेते अशी त्यांची ओळख आपण अनेकदा पाहिली आहे.

भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित चित्रपटाची निर्मिती अक्षय अनंत देशमुख यांनी केली आहे. तर चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. तर चित्रपटाची सहनिर्माते अनुराग भुसारी, मिहिर फाटे हे आहेत.

‘गडकरी’ चित्रपटामध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार? अद्याप ही माहिती गुलदस्त्यात आहे. या प्रमुख भूमिकेत कोणता कलाकार असेल, सध्या याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचा पोस्टर ‘राजश्री मराठी’ या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. पोस्टच्या कमेंटबॉक्समध्ये अनेक चाहत्यांनी कोणता कलाकार दिसणार, याचा अंदाज लावला आहे. अनेकांनी चित्रपटामध्ये भारत गणेशपुरे दिसणार असा अंदाज लावलाय. गडकरींच्या मुख्य भूमिकेत कोणता कलाकार दिसणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी यांनी सांगितले की, “नितीन गडकरी यांची देशाच्या राजकारणातील कारकिर्द नक्कीच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर- निरपेक्ष विचार करणारा नेता, हायवे मॅन ॲाफ इंडिया, या त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीलम गोर्हे कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात दाखल

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT