HBD Suniel Shetty Saam Tv
मनोरंजन बातम्या

HBD Suniel Shetty: फार्महाउस आहे की राजवाडा? सुनील शेट्टीची खंडाळ्यातील प्रॉपर्टी पाहून थक्क व्हाल

Suniel Shetty Farm House : सुनील शेट्टीच्या खंडाळ्याच्या फार्महाउसची चर्चा सर्वदूर होताना दिसते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Suniel Shetty Farm House In Khandala

सुनील शेट्टी हा बॉलिवूडमधील ज्येष्ठ कलाकार आहे. गेले ३ दशक सुनील शेट्टीने सातत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सुनील शेट्टी अभिनासोबतच निर्माता आणि उद्योजकदेखील आहे. सुनील शेट्टी आज ६२ वा वाढदिवस साजरा करत आहे. ६२ वय असले तरीही त्याचा फिटनेस अनेक तरुणांना लाजवेल असा आहे.

सुनील शेट्टी त्याच्या लाईफस्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो अत्यंत लॅविश आयुष्य जगतो. त्याचे घरही त्याचप्रमाणे आलिशान आहे. सुनील शेट्टीची अनेक घरं आहेत. परंतु त्याच्या खंडाळ्याच्या फार्महाउसची चर्चा सर्वदूर होताना दिसते.

सुनील शेट्टीचा खंडाळ्यात एक सुंदर फार्महाउस आहे. त्याच्या फार्महाउसचे नाव 'जहान' आहे. सुनील शेट्टी नेहमी आराम करण्यासाठी फार्महाउसवर जातो. त्याच्या फार्महाउसच्या परिसरात एक पाण्याचा झरा आहे. त्याच्यावर एक लाकडी ब्रिजदेखील आहे. या ब्रिजवरुन निसर्गरम्य वातावरण अनुभवू शकतो. सुनील शेट्टीच्या या बंगल्यात एक स्विमिंग पूलही आहे. त्याच्या बाजूला गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहेत.

सुनील शेट्टीच्या फार्महाउसमध्ये ओपन रुफ सिटींग आहे. सुनील शेट्टीच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराच्या सुरवातीला सिंहाचे दोन स्टॅच्यू आहे. प्रवेशद्वाराजवळ खूप सुंदर झाडे आहेत. सुनील शेट्टीच्या बंगल्यात एक मिनी थिएटर आहे. येथे सुनील शेट्टी अनेकदा कुटुंबियांसोबत चित्रपट पाहतो. त्याच्या लिव्हिंग रुममध्ये अनेक पेटिंग्स तसेच स्टॅच्यू आहेत.

अनेक शंख शिल्पे यापासून बनलेल्या सजावटीच्या गोष्टी सुनील शेट्टीच्या फार्महाउसमध्ये आहे. यामुळे घराला अगदी ऐतिहासिक असल्याचा लूक आला आहे. खंडाळ्याच्या या बंगल्यासमोर एक मोठी बाग आहे. सुनील शेट्टीच्या बंगल्याच्या आजूबाजूला खूप नैसर्गिक गोष्टी आहेत. त्या बागेतून समोर हिरवेगार डोंगर दिसतात. त्याच्या या घरातून खंडाळा घाटही दिसतो.

सुनील शेट्टीच्या याच बंगल्यात त्याची मुलगी अथिया शेट्टीचे लग्न झाले होते. मुलगी अथिया आणि जावई के एल राहुलने याच बंगल्यात लग्नगाठ बांधली होती. त्यामुळे सुनील शेट्टीच्या या फार्महाउसच्या चर्चांना अजूनच उधाण आले होते. सुनील शेट्टीच्या संपत्तीतील हा बंगला आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT