सुनील शेट्टीला बॉलिवूडचा अण्णा म्हणून ओळखले जाते. अण्णा म्हणजे मोठा भाऊ. सुनील शेट्टी देखील इंडस्ट्रीतील इतर कलाकरांसाठी मोठा भाऊच आहे. सुनील शेट्टीने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सुनील शेट्टी आज त्याचा ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
सुनील शेट्टीचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ ला झाला. वयाच्या ३१ व्या वर्षी सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुनील शेट्टी गेल्या ३ दशकांपासून सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
सुनील शेट्टी अभिनेता तर आहेच, त्याचसह तो निर्माता, व्यावसायिक देखाल आहे. १९९२ चा 'बलवान' हा सुनील शेट्टीचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर सुनील शेट्टीने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिवसेंदिवस त्याची प्रसिद्धी वाढतच गेली.
'धडकन' चित्रपटातील त्याची खलनायकाची भूमिका प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. सुनील शेट्टी नायक, खलनायक तसेच कॉमेडीसाठीही प्रसिद्ध आहे. परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीच्या कॉमेडी 'फिर हेरा फेरी' चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.
फक्त फिल्मी दुनियेत नाही तर व्यावसायिक जीवनातही त्याने खूप नावलौकिक कमावला आहे. अभिनेता आणि व्यवसायित असलेल्या सुनील शेट्टीच्या संपत्तीत देखील दिवसेंदिवस वाढ आहे. आम्ही तुम्हाला सुनील शेट्टीच्या एकूण संपत्तीबद्दल सांगणार आहोत.
एका रिपोर्टनुसार, सुनील शेट्टींची संपूर्ण संपत्ती जवळपास ११ मिलियनच्या घरात आहे. म्हणजेच, भारतीय चलनानुसार ही संपत्ती ८८ कोटींची आहे. याचबरोबर अभिनेता वर्षभरात १५ कोटींपेक्षाही जास्त कमाई करतो.
सुनील शेट्टी चित्रपट, अॅडव्हर्टाइझमेंट आणि हॉटेलच्या व्यवसायातून कमाई करतो. याचबरोबर सुनील शेट्टी मिस्चीफ डायनिंग आणि क्लब H20 चा मालक आहे. यातूनच सुनील शेट्टींची कमाई होते.
एका रिपोर्टनुसार, सुनील शेट्टी एका चित्रपटासाठी ४ कोटींचे मानधन घेतो. चित्रपट आणि व्यवसाय करणाऱ्या सुनील शेट्टीचे स्वतः चे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. या प्रोडक्शन हाउसमध्ये 'भागम भाग', 'ईएमआय', 'रख्त और मिशन इस्तांबुल' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
सुनील शेट्टीला खऱ्या अर्थाने 'फिर हेरा फेरी' या चित्रपटाने प्रसिद्धी मिळवून दिली. या कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले होते. प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची मागणी केली होती. प्रेक्षकांची ही इच्छा आता पुर्ण होणार आहे. 'फिर हेरा फेरी ३' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Latest Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.