Pratik Gandhi And Patralekhaa to star in Jyotirao Phule-Savitribai Phule biopic
Pratik Gandhi And Patralekhaa to star in Jyotirao Phule-Savitribai Phule biopic Twitter/ @ananthmahadevan
मनोरंजन बातम्या

महात्मा फुले - सावित्रीमाईंच्या समाजकार्यावर बायोपिक; मुख्य भूमिकेत कोण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आनंद महादेवन (Anand Mahadevan) यांनी त्यांच्या 'फुले' या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. आज महात्मा फुले (Mahatma Phule) यांची १९५ वी जयंती आहे, याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या नव्या चित्रपटाची (mahatma phule biography) घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका अभिनेता प्रतिक गांधी (Pratik Gandhi) तर सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री पत्रलेखा (Patralekha) साकारणार आहे. महात्मा फुलेंवर आधारीत हा हिंदी बायोपिक २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. दिग्दर्शक आनंद महादेवन यांनी या चित्रपटाचं पोस्टर शेयर केलं आहे. यावेळी ते म्हणाले, भारताचे पहिले महात्मा आणि सामाजिक क्रांती घडवणारे भारतातील पहिले जोडपे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजकार्याला सिनेमॅटिक व्हिजन देणं हा माझा सम्नान आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे. (Pratik Gandhi and Patralekhaa to essay the roles of Mahatma Jyotirao Govindrao Phule and Savitribai Phule in Phule, first look out)

हे देखील पहा -

महात्मा ज्योतिबा फुले यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी उत्सुक असलेले प्रतीक गांधी म्हणतात, "महात्मा फुले यांची भूमिका साकारणे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व जगासमोर मांडणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी पहिल्यांदाच एका बायोपिक चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. ही व्यक्तिरेखा साकारणे हे माझ्यासाठी एका मोठ्या आव्हानापेक्षा कमी नाही, पण एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याने मी महात्मा फुले यांची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. पुढे प्रतिक म्हणतात, "मला आठवतं की, चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर मी लगेचच हा चित्रपट करण्यास होकार दिला. काही पात्रांवर कोणाचे तरी नाव लिहिलेले असते आणि अनंत सरांनी मला त्यात काम करण्याची ऑफर दिल्याने मला खूप आनंद होतो. आजच्या पिढीला महात्मा आणि सावित्री फुले यांच्या सामाजिक परिवर्तनासाठी समर्पित जीवनाबद्दल शिक्षित करण्यात या चित्रपटाच्या निर्मात्यांनी पुढाकार घेतला आहे याचा मला खूप आनंद आहे."

या चित्रपटातील अभिनेत्री पत्रलेखा म्हणाली, "माझं संगोपन मेघालयातील शिलाँगमध्ये झालं आहे. हे असे राज्य आहे जिथे पुरुषांपेक्षा महिलांचे अधिकार आणि निर्णयांना अधिक महत्त्व दिले जाते. अशा परिस्थितीत स्त्र - पुरुष समानतेची गरज आहे. या विषयाला माझ्या हृदयात खूप महत्त्वाचे स्थान आहे. सावित्री फुले यांनी त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने 1848 मध्ये मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरु केली. महात्मा फुले यांनी विधवांचे पुनर्विवाह करण्यासाठी आणि गर्भपातावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनाथाश्रमाची स्थापना केली. हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे."

लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक असलेले अनंत महादेवन अलीकडे 'मी सिंधुताई सकपाळ' या बायोपिकमुळे चर्चेत होते. या चित्रपटात 'सिंधुताई सकपाळ' यांच्या जीवनाचा अनोखा प्रवास दाखवण्यात आला आहे. सिंधुताई सकपाळ यांनी मसिहा बनून निराधार मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न कसे केले हे दिसून येते. अनंत महादेवन यांनी प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिकावर बनवलेल्या 'गौरहरी दास्तान' या चित्रपटात एका स्वातंत्र्यसैनिकाचा 32 वर्षे स्वतःच्या सरकारशी लढा दाखवण्यात आला आहे. या चित्रपटांव्यतिरिक्त अनंत महादेवन यांनी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई यांच्यावरील चित्रपट आणि त्याच नावाने 'मायघाट' आणि 'बिटर स्वीट' सारखे चित्रपट दिग्दर्शित करून सामाजिकदृष्ट्या वेगळ्या कथा अतिशय संवेदनशील आणि मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत.

विद्येविना मती गेली।

मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली।

गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

या चार वाक्यात शिक्षणाचे महत्त्व सांगणारे ज्योतिबा फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनाही महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवान केले. यावेळी ते म्हणाले, "सामाजिक न्यायाचे चॅम्पियन आणि असंख्य लोकांसाठी आशेचा स्रोत म्हणून महात्मा फुले यांचा आदर केला जातो. ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते ज्यांनी सामाजिक समता, महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन." दरम्यान अभिनेता प्रतिक गांधी हे स्कॅम १९९२ (Scam 1992) या वेबसिरीजमधून प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यांनी शेयर मार्केट किंग हर्षद मेहता यांची भूमिका साकारली होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: राज्यातील १३ जागांवर ठाकरे गटविरुद्ध शिवसेना,तर १५ जागेवर काँग्रेसची भाजपशी लढत

Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

Amitabh Bachchan: कोस्टल रोड, अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट; भाजप अन् आदित्य ठाकरेंमध्ये रंगलं ट्विट वॉर

Investment Tips: गुंतवणूक करताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT