Elvish Yadav Saam TV
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav Video: सापांची तस्करी, रेव्ह पार्ट्या.... गंभीर आरोपांनंतर एल्विश यादवचा पहिलाच व्हिडिओ आला समोर

Elvish Yadav Clarifies After Allegation: यासर्व आरोपांनंतर आता एल्विश यादव याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Priya More

Bigg Boss OTT 2 Winner:

यूट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) अडचणीत आला आहे. शुक्रवारी त्याच्यावर नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विषारी सापांची तस्करी आणि अवैध रेव्ह पार्ट्या करत असल्याचा एल्विश यादववर आरोप आहेत. या पार्टींमध्ये तो परदेशी मुलींनाही आमंत्रित करत असल्याचे आरोप आहेत.

या प्रकरणी नोएडा पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून ५ जणांना अटक केली आहे. पोलिस सध्या एल्विशचा शोध घेत आहे. या सर्व आरोपांनंतर आता एल्विश यादव याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एल्विशने हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एल्विश यादवने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि एक्स अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, 'मी सकाळी उठलो. माझ्या विरोधात कोणत्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत हे मी पाहिले. एल्विश यादवला अटक झाली, एल्विश यादव ड्रग्जसह पकडला गेला...अशा बातम्या येत आहेत. या सगळ्या गोष्टी माझ्याविरोधात पसरवल्या जात आहेत. माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. सर्व खोटे आहेत. त्यात १ टक्काही सत्य नाही.'

एल्विशने पुढे सांगितले की, 'मी यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. मी यूपी पोलिस, संपूर्ण प्रशासन, माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करेन की या गोष्टीत माझा एक टक्काही सहभाग आढळला तर मी सर्व जबाबदारी घेण्यास तयार आहे.' यावेळी एल्विशने मीडियाला देखील विनंती केली आहे की, 'जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत अशा बातम्या प्रसिद्ध करू नका. माझे नाव बदनाम करू नका. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. दूर दूरपर्यंत १०० मैलांपर्यंत माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. हे आरोप सिद्ध झाले तर मी जबाबदारी घ्यायला तयार आहे.'

दरम्यान, भाजप खासदार मनेका गांधी यांच्या पीपल फॉर अॅनिमल्स या संस्थेत काम करणाऱ्या गौरव गुप्ता यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. एल्विशवर असा आरोप आहे की, तो नोएडा आणि एनसीआरच्या फार्म हाऊसमध्ये जिवंत सापांसह व्हिडिओ शूट करायचा. याशिवाय रेव्ह पार्ट्यांमध्येही सापाच्या विषाचा वापर करत होता. याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 9 विषारी साप आणि 20 मिमीचे सापाचे विष जप्त केले आहे. यामध्ये पाच कोब्रा, एक अजगर, दोन डोके असलेले साप आणि एका रेट स्नेकचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT