Pallavi Prashanth Arrested Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pallavi Prashanth Arrested: 'बिग बॉस 7' विजेत्या पल्लवी प्रशांतला अटक, नेमकं काय आहे प्रकरण?

Priya More

Bigg Boss Telugu Season 7:

'बिग बॉस तेलुगू 7' चा विजेता पल्लवी प्रशांतला (Pallavi Prashanth) तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या हिंसक घटनेप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शो जिंकून बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर अवघ्या चार दिवसांत पल्लवी प्रशांतला जेलमध्ये जावे लागले आहे. पल्लवी प्रशांत हा प्रसिद्ध युट्युबर आहे. अटकेनंतर प्रशांत आणि त्याचा भाऊ मनोहरला २० डिसेंबरला रात्री कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या त्यांची रवानगी चंचलगुडा तुरुंगात करण्यात आली आहे.

पल्लवी प्रशांत आणि त्याचा भाऊ मनोहर यांच्याविरोधात जुबली हिल्स पोलिसांनी शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे आणि वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. एएनआयच्या वृत्तानुसार, पल्लवी प्रशांत आणि त्याच्या भावाविरोधात भारतीय दंड संहिता कलम १४७, १४८, २९०, ३५३, ४२७ आणि १४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक केली. २० डिसेंबरला त्यांना सद्दीपेट जिल्ह्यातील त्यांच्या गावातून अटक करण्यात आली होती.

रियालिटी शो 'बिग बॉस तेलुगू ७'चा ग्रँड फिनाले काही दिवसांपूर्वी पार पडला. या ग्रँड फिनालेमध्ये होस्ट नागार्जुनने पल्लवी प्रशांत विजेता असल्याची घोषणा केली. यावेळी प्रशांतच्या चाहत्यांनी या शोच्या सेटच्या बाहेर मोठी गर्दी करत जल्लोष करत गोंधळ घातला. त्याच्या चाहत्यांनी या रियालिटी शोचा रनर अप अमरदीप चौधरीच्या कारवर हल्ला करत तोडफोड केली.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पल्लवी प्रशांतने 'बिग बॉस ७' शो जिंकल्यानंतर हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओबाहेर त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अमरदीप त्याची आई आणि पत्नी तेजस्विनीसोबत घरी परतत असताना पल्लवी प्रशांतच्या चाहत्यांनी त्याच्या कारला घेराव घालून हल्ला केला. यावेळी अमरदीप यांच्या कारच्या काचाही फुटल्या. ही घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली आहे. आता पोलीस या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या प्रकरणाचा तपास करत असून या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांचा शोध घेत आहेत.

'बिग बॉस तेलुगू ७' चा ग्रँड फिनाले एपिसोड १७ डिसेंबर रोजीच प्रसारित झाला. ज्यामध्ये पल्लवी प्रशांतला विजेता म्हणून घोषीत करण्यात आले. यावेळी प्रशांतच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. पल्लवी प्रशांतला'बिग बॉस तेलुगू 7' ची ट्रॉफी आणि ३५ लाखांचे रोख बक्षीस देण्यात आले. शोचा स्पर्धक अमरदीप चौधरी सीझनचा उपविजेता ठरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

SCROLL FOR NEXT