Bigg Boss Marathi 1st Nomination  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Season 4: समृद्धीने बिग बॉसच्या घरात 'बाबांना' दाखवला घरचा रस्ता ? प्रोमो जबरदस्त चर्चेत

बिग बॉस मराठीतून पहिला स्पर्धक घराच्याबाहेर जाण्याची वेळ आली आहे. १६ स्पर्धकांतून एका स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु झाल्यापासून चांगलेच वादळी ठरले आहे. कधी स्पर्धकांच्या भांडणामुळे तर कधी त्यांच्या धम्माल मस्तीने. बिग बॉसच्या घरात सर्वाधिक उत्सुकतेची गोष्ट असते ती म्हणजे चावडी. चौथ्या पर्वातील पहिलीच चावडी घरातील मुख्य सूत्रधार महेश मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या चावडीत बऱ्याच स्पर्धकांवर त्यांनी टीकेचे बाण ही सोडले. त्यामुळे ते स्पर्धक बरेच चर्चेत आले आहे. गेल्या आठवड्यात अपूर्वा नेमळेकर, प्रसाद जवादे आणि निखिल राजेशिर्के यांच्यामुळे घरात चांगलेच वादंग निर्माण झाले होते. त्याचेच निमित्त साधत महेश मांजरेकरांनी स्पर्धकांची खरडपट्टी काढली. सर्वाधिक मांजरेकरांनी अपूर्वा आणि प्रसाद यांच्यावर भडकले होते. बिग बॉसचे घर सर्वात जास्त अपूर्वामुळेच गाजले.

बिग बॉस मराठीतून पहिला स्पर्धक घराच्याबाहेर जाण्याची वेळ आली आहे. १६ स्पर्धकांतून एका स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. त्यात सर्वात आघाडीचे नाव म्हणजे किरण माने. नेहमीच किरण माने सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या चाहत्यांना वाटत होते की किरण माने यंदा या सीझनमध्ये आपले नाव कोरतील. पण किरण मानेला पहिल्याच दिवशी स्पर्धकांनी निरूपयोगी खेळाडू असल्याचे ठरवले. नेमके घरातून कोण कोण जाणार यात अमृता देशमुख, यशश्री मसुरकर आणि किरण माने यांचे नावे आघाडी वर आहेत.

बिग बॉसच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक प्रोमो शेअर करत कोणता स्पर्धक घरी जाऊ शकतो याची कल्पना देण्यात आली आहे. तीन स्पर्धकांपैकी मांजरेकर इतर स्पर्धकांना विचारतात की, त्यांना बिग बॉसच्या घरातील कोणाचा प्रवास इथेच थांबावावा वाटतो. त्यावर सगळ्यांनी किरण मानेचे नाव पुढे केले. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून किरण मानेंना बाबा नावाने हाक मारणारी समृद्धीनेही किरण मानेचच नाव घेतलं. त्यावर मांजरेकरांनी तिला चांगलाच सुनावले.

आता घराबाहेर कोणता स्पर्धक जाणार हा निर्णय बिग बॉस महेश मांजरेकर घेणार आहेत. यातच बाहेर जाणाऱ्या स्पर्धकांमध्ये अमृता देशमुख, यशश्री मसुरकर आणि किरण माने यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. आता बिग बॉसच्या घराबाहेर जाणारा पहिला स्पर्धक कोण ठरणार हे बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast : दिल्लीतील स्फोटामुळे खळबळ; देशाला हादरवणाऱ्या घटनेवर कोण काय म्हणाले?

Tuesday Horoscope : महत्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडणार; ५ राशींच्या लोकांच्या हातून मोठं काहीतरी घडणार

Pune Accident : पुण्यात अपघाताचा थरार; कारने अनेक वाहनांना उडवलं, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Delhi Blast: इतिहासाची पुनरावृत्ती? २००५च्या स्फोटांनंतर पुन्हा एकदा दहशतीचा माहोल, वाचा दिल्लीतील स्फोटांची संपूर्ण यादी

Lal Quila Blast Update : दिल्ली हादरली! गाड्यांच्या चिंधड्या, १३ ठार तर ३० जखमी; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार|VIDEO

SCROLL FOR NEXT