Elvish Yadav Saam TV
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav: पोलिसांनी विचारलेल्या या १० प्रश्नांनी एल्विश यादवला फुटला घाम, चौकशीदरम्यान काय घडलं?

Priya More

Bigg Boss OTT 2:

'बिग बॉस ओटीटी 2' चा (Bigg Boss OTT 2) विनर एल्विश यादवच्या (Elvish Yadeav) अडचणी वाढत चालल्या आहेत. एल्विशला विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करत पोलिसांनी अटक केली. सध्या नोएडा पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. मंगळवारी पोलिसांनी एल्विशनची तब्बल ५ तास चौकशी केली. त्यानंतर बुधवारी रात्री देखील पोलिसांनी त्याची ३ तास कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान पोलिसांनी एल्विशनला त्याच्या ४० प्रश्न विचारल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता एल्विश यादवची नोएडाच्या सेक्टर-२० पोलीस स्टेशनमध्ये चौकशी झाली. नोएडाचे डीसीपी आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांनी एल्विशची चौकशी केली. ही चौकशी ३ तास चालली. आज पुन्हा एल्विशनची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. चौकशीदरम्यान एल्विश यादवला जवळपास ४० प्रश्न विचारण्यात आले होते. ज्याचे उत्तर देण्यासाठी एल्विशला खूप त्रास झाला.

एल्विशला त्याचे मित्र आणि शाळेपासून ते रेव्ह पार्ट्या आणि ड्रग्ज या सर्व गोष्टींबद्दल पोलिसांनी प्रश्न विचारले. पण जेव्हा एल्विशला साप आणि राहुलबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. पोलिसांनी एल्विशला त्याच्या व्हिडीओमध्ये दिसणारे साप ते पार्ट्यांमधील परदेशी मुली आणि मुख्य आरोपी राहुलपर्यंत प्रश्न विचारले. मनेका गांधी यांच्या संघटनेच्या संपर्कात ते कसे आले आणि फोनवर काय संभाषण झाले, अशीही विचारणा पोलिसांकडून करण्यात आली. या सर्व प्रश्नांची उत्तरं देताना एल्विश यादव पूर्णपणे अस्वस्थ दिसत होता.

एल्विश यादवला जेव्हा शाळा, मित्र आणि कुटुंबाबद्दल प्रश्न विचारले जात होते तेव्हा तो आरामात उत्तरे देत होता. मात्र सापाच्या विषाच्या तस्करीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागताच एल्विश घाबरला. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. आता पोलिसांनी एल्विशकडे त्याचे कॉल डिटेल्स आणि त्याच्या पूर्वीच्या सर्व लोकेशन्सचा डेटा मागितला आहे. चौकशीदरम्यान एल्विश यादव आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगत होता. एल्विशने दावा केला की, अनेक लोक त्याला अडकवण्याचा कट रचत आहेत.

चौकशीदरम्यान एल्विशनला पोलिसांनी विचारलेले १० पश्न -

१. तुझ्या व्हिडिओमध्ये दिसणारे साप कुठून आणले होते?

२. राहुल कोण आहे आणि तो तुमच्यासाठी कसा काम करतो? तू रविनाथ, नारायण आणि तितुनाथ यांनाही ओळखतो का?

३. तू राहुलच्या संपर्कात कसा आला आणि त्याने सापांचे व्हिडीओ का बनवले? तुमचा उद्देश काय होता?

४. नोएडा आणि एनसीआरमध्ये तुम्ही कुठे रेव्ह पार्ट्या आयोजित केल्या? पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाची तस्करी करण्यात तुझी भूमिका काय आहे?

५. तू सापांसोबत पोज का देत होता? तुझ्यावर झालेल्या आरोपांवर तुला काय म्हणायचे आहे?

६. रेव्ह पार्टीसाठी परदेशी मुलींना कुठून आणि कसे आमंत्रित केले होते?

७. रेव्ह पार्ट्यांना परदेशी मुलींना कोण आणायचे? तू त्यांना ओळखतो का? तू त्ंयाच्याशी संपर्क कसा साधला?

८. तुला ड्रग्जचे व्यसन आहे का? तू कोणते ड्रग्ज सेवन करतो?

९. मनेका गांधींच्या संघटनेतील लोकांनी तुला फोन केला होता का?

१०. तू त्या लोकांना राहुल यादवचा नंबर दिला होता का? तितुनाथ, राहुल, रविनाथ आणि नारायण यांना कसे भेटले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

VIDEO : PM मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून, बघा काय म्हणाले?

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

SCROLL FOR NEXT