मनोरंजन बातम्या

Elvish Yadav: एल्विशच्या विषारी पार्टीचं काय आहे बॉलिवूड कनेक्शन? मुंबईतील कलाकारही आता पोलिसांच्या रडारवर

Elvish Yadav News: एल्विशने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आणि बॉलिवूडमधील कॉन्टॅक्टच्या मदतीने मुंबईत या पार्ट्यांचा ट्रेंड आणल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Manasvi Choudhary

Bigg Boss OTT 2 Winner: 'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता एल्विश (Elvish Yadav) यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एल्विशवर विषारी सापांची तस्करी केल्याचा आणि बेकायदेशीरपणे रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे सापाचे विष सापडले आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या शहरात सापाचे विष पुरवणाऱ्या टोळ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केलीये. या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.सदर पार्ट्यांचा संबंध आता बॉलिवूडमध्ये आहे असा पोलिसांना संशय आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका रिपोर्टनुसार, सापांचे विष पुरवणारे रॅकेट संपूर्ण देशभर पसरले आहे. एल्विशने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आणि बॉलिवूडमधील कॉन्टॅक्टच्या मदतीने मुंबईत या पार्ट्यांचा ट्रेंड आणल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळेच अनेक बॉलिवूड कलाकारही तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत.

अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. बॉलिवूडमधील कोण कोण त्याच्या संपर्कात आहे? एल्विश नक्की काय काम करतो? मुंबईत अशा पार्ट्या केल्या होत्या का? यासाठी एल्विशची चौकशी करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांशी देखील संपर्क केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मुंबईतील रेव्ह बॉलिवूड पार्टीमध्ये विषारी सापांचे विष आणले असावे असा पोलिसांचा संशय आहे. यासाठी एल्विशने याआधी कोणत्या पार्ट्यांना हजेरी लावली होती? त्या पार्ट्यांमध्ये कोणते सेलिब्रिटी उपस्थित होते? याची माहिती पोलिसांनी घ्यायची आहे.

पीपल ऑफ अॅनिमल्स संस्थेच्या गौरव गुप्ता यांनी एल्विशवर गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, नोएडातील एका पार्टीत सापाचे विष वापरण्यात येणार होते. यानंतर पोलिसांनी छापा टाकून रविनाथ, नारायण, जयकरण, टिटूनाथ आणि राहुल यांना अटक केली. आरोपींकडून साप जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सापांची खरेदी विक्री करण्यास मनाई आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडूनच एल्विशचे नाव समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT