बिग बॉस 'ओटीटी' मध्ये मोठे बदल!  Saam Tv
मनोरंजन बातम्या

बिग बॉस 'ओटीटी' मध्ये मोठे बदल!

करण जोहर बिग बॉस ओटीटी होस्ट करताना दिसणार आहे .यावेळी बऱ्याच नवीन गोष्टी या शोमध्ये पाहायला मिळणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : टीव्हीचा लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस' Bigg Boss चा नवीन सीझन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी हा शो पहिल्या ओटीटी OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाईल, ज्याला 'बिग बॉस ओटीटी' असे नाव देण्यात आले आहे. करण जोहर बिग बॉस ओटीटी होस्ट करताना दिसणार आहे .यावेळी बऱ्याच नवीन गोष्टी या शोमध्ये पाहायला मिळणार आहेत. बिग बॉस OTT चे स्वरूप एकदम अनोखे आहे. एक नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे आणि असे सांगण्यात आले आहे की यावेळी ओटीटी बिग बॉस ओव्हर द टॉप असणार आहे.

बिग बॉस ओटीटीमध्ये प्रेक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. स्पर्धकाचे कार्य हरल्याबद्दल शिक्षेचा अधिकार प्रेक्षकांनाही मिळणार आहे. आता हे कसे होईल, हे शो सुरू झाल्यानंतरच कळेल.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर्शक बिग बॉसशी 24 तास कनेक्ट राहू शकतात. प्रेक्षकांना शोमध्ये 24 प्रवेश तसेच स्पर्धकांचे भवितव्य असेल.

हा शो नेहमीपेक्षा धाडसी आणि धोकादायक होणार आहे. प्रोमोमध्ये करण जोहरने एक इशारा दिला आहे की स्पर्धकांच्या टास्कमध्ये बोल्ड टास्क राहतील. यावेळी बिग बॉस ओटीटी कडून नाटक, मनोरंजन आणि भावनांची उच्च लेव्हल अपेक्षित आहे.

बिग बॉस ओटीटी 6 आठवडे चालणार आहे. हे OTT प्लॅटफॉर्म Voot वर प्रसारित केला जाईल. ओटीटी बिग बॉसमध्ये 6 आठवडे उपस्थित राहिल्यानंतर, विजेते स्पर्धक कलर्सवरील आगामी बिग बॉसमध्ये सामील होतील. सलमान खान टीव्हीवर हा रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! १० तोळ्याागे ७७०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धांतील मृत सैनिकांचा सन्मान कसा केला जात असे?

Box Office Collection: 'धुरंधर'ने मारली बाजी, केलं कोट्यवधींच कलेक्शन; जाणून घ्या कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची कमाई

Gajkesari Rajog 2026: 2 जानेवारीपासून चमकणार या राशींचं भविष्य; 12 वर्षांनी बनणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग

SCROLL FOR NEXT