Bigg Boss OTT 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3 : ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरातून दोन स्पर्धक जाणार बाहेर, टिकटॉक स्टारची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

Bigg Boss OTT 3 Wild Card Contestant : बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत चार स्पर्धक बाहेर पडले आहेत. अशातच आता चर्चा होतेय ती वाईल्ड कार्ड स्पर्धकाची.

Chetan Bodke

‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये सध्या जोरदार भांडण होताना दिसत आहे. स्पर्धकांमध्येच आपआपसात कडाक्याचा वाद होताना गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. गेल्या आठवड्यामध्ये, विशाल पांडे आणि अरमान मलिकमध्ये कडाक्याचा वाद झाला होता. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरामध्ये, मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात एकूण १४ स्पर्धक होते. त्यातील चार स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. आता अशातच चर्चा होतेय ती वाईल्ड कार्ड स्पर्धकाची.

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये अनेक ओटीटी स्पर्धक आहेत. सध्या तिसरा सीझन सुरू असून लवकरच पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री होणार आहे. सोशल मिडिया एन्फ्लूएंसर आणि टिकटॉक स्टार अदनान शेख बिग बॉसच्या घरात एन्ट्री मारणार आहे.

अदनान शेखची इन्स्टाग्रामवर फॅनफॉलोविंग ११ मिलीयन इतकी आहे. त्याच्या इतका चाहतावर्ग इतर कोणत्याही सोशल मिडिया एन्फ्लूएंसरकडे नाही. तो टीक टॉकच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला होता.

ज्याप्रमाणे एल्विश यादवने बिग बॉस ओटीटी सीझन २ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता, त्याच प्रकारे निर्मात्यांकडून अदनान शेखच्या एन्ट्रीची योजना आखली जात आहे.

एकीकडे वाइल्ड कार्ड स्पर्धक बिग बॉस OTT 3 मध्ये प्रवेश करणार असताना, मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कपूर या आठवड्यात शोमधून दोन स्पर्धकांना एलिमिनेट करणार आहे. आतापर्यंत नीरज गोयत, पायल मलिक, पौलोमी दास आणि मुनिषा खटवानी यांना रिॲलिटी शोमधून एलिमिनेट करण्यात आले आहे. अरमान मलिक, लवकेश कटारिया, विशाल पांडे, वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित आणि शिवानी कुमारी यांना एलिमिनेटसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. येत्या आठवड्यात कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangram Jagtap: राष्ट्रवादीत 'संग्राम', अजित पवारांना 'ताप' जगतापांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच

De De Pyaar De 2 Trailer: अजय देवगण-रकुलच्या प्रेमात आर माधवन ठरणार अडसर; ट्रेलर पाहून हसून हसून पोट दुखेल

Credit Card: क्रेडिट कार्डचं कर्ज वाढत चाललंय? घाबरु नका! वापरा स्मार्ट अन् सोप्या टिप्स, बिल होईल कमी

Weather Update : दिवाळीत धो-धो कोसळणार? परतीचा पाऊस त्रास देणार; वाचा Report

Thackeray Brothers: मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचं पारडं जड, 70 जागांवर मनसेची मतं निर्णायक?

SCROLL FOR NEXT