Chetan Bodke
गेल्या काही दिवसांपासून ‘झलक दिखला जा ११’ ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते.
नुकतंच ‘झलक दिखला जा ११’ या लोकप्रिय डान्स रिॲलिटी शोचा नुकताच ग्रँड फिनाले मोठ्या दणक्यात पार पडला.
या कार्यक्रमाची ट्रॉफी बिहारच्या मनीषा राणी हिने पटकावली आहे. मनीषा राणी ही वाईल्ड कार्ड स्पर्धकांपैकी एक आहे.
‘झलक दिखला जा ११’ची ट्रॉफी बिहारच्या मनीषा राणी हिने पटकावली असून तिला ट्रॉफीसह ३० लाख रुपये मिळाले आहेत.
तर कोरिओग्राफर आशुतोष पवारला १० लाख रुपये मिळाले. असून दोघांनाही दुबईजवळील एका बेटावरही सहलीची तिकिटे देखील मिळाली आहे.
मनीषा राणी हिने शोएब इब्राहिम आणि अद्रिजा सिन्हाला मागे टाकत ‘झलक दिखला जा ११’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
विजेती झाल्यानंतर मनीषाने "माझ्या वडिलांपेक्षा माझा चाहत्यांवर जास्त विश्वास आहे. चाहत्यांनीच मला जिंकवलं आहे." अशी प्रतिक्रिया दिली.
मनीषा रानीने विजेतेपद पटकावल्यानंतर तिचा कोरिओग्राफर आशुतोष पवार भावूक झाला होता.
मनीषा राणी हिच्यावर फक्त चाहत्यांकडूनच नाही तर, अनेक सेलिब्रिटींकडूनही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.