Salman Khan Not Hosting Bigg Boss OTT 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

सलमान खान ' Bigg Boss OTT 3' होस्ट करणार नाही?, बिग बॉसचा नवा होस्ट कोण?

Bigg Boss OTT 3 Host : तिसऱ्या सीझनसाठी निर्मात्यांनी सलमान खानच्या ऐवजी बॉलिवूडमधील अन्य तीन दिग्गज सेलिब्रिटींना अप्रोच केल्याचं कळत आहे.

Chetan Bodke

'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी दुसरा सीझनचा ग्रँड फिनाले पार पडला. आता 'बिग बॉस ओटीटी'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिग बॉस म्हटलं की, आपसुकच आपल्या डोळ्यासमोर होस्ट सलमान खान येतोच.

सलमान खानने आजवर 'बिग बॉस' टिव्हीवरील सर्व सीझन्स आणि 'बिग बॉस ओटीटी'वरील दोन्हीही सीझन्सचे त्याने होस्टिंग केली. पण आता येणाऱ्या 'बिग बॉस ओटीटी'च्या सीझनमध्ये मात्र सलमान खान दिसणार नाही, अशी सध्या चर्चा होत आहे. तिसऱ्या सीझनसाठी निर्मात्यांनी सलमान खानच्या ऐवजी बॉलिवूडमधील अन्य तीन दिग्गज सेलिब्रिटींना अप्रोच केल्याचं कळत आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, सलमान खान सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्याचे कळत आहे. त्याच्या प्रोजेक्ट्सच्या तारखा आणि बिग बॉसच्या ओटीटीच्या तारखांमध्ये क्लॅश होत आहेत. यामुळे सलमान खान 'बिग बॉस ओटीटी' होस्ट करू शकत नाही, अशी माहिती आहे. शोच्या निर्मात्यांनी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त, अनिल कपूर आणि करण जोहर यांच्याशी संपर्क साधला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस ओटीटी ३'येणार नसल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण नंतर ती अफवा निघाली.

खात्रीलायक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या शुटिंगच्या आणि 'बिग बॉस ओटीटी'च्या शुटिंगच्या डेट क्लॅश होत आहेत. शोचे निर्माते सलमान खानसोबत सतत चर्चा करत आहेत. जर सलमान खान त्याच्या बिझी शेड्युलमुळे शो होस्ट करू शकणार नसेल तर निर्माते संजय दत्त, अनिल कपूर आणि करण जोहरशी संपर्क साधला आहे.

करण जोहर सध्या त्याच्या आगामी शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामुळे अद्याप तो शोच्या निर्मात्यांना भेटू शकलेला नाही. सोबतच अनिल कपूरही आणि संजय दत्त निर्मात्यांना भेटलेला नाही. बिग बॉस ओटीटीचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत. पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता. तर दुसरा सीझन सलमान खानने होस्ट केला होता. आता सीझन 3 कोण होस्ट करतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT