Bigg Boss OTT 3 Contestant Nominates Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3 Nomination : अरमान मलिकपासून सना सुलतानपर्यंत...; 'बिग बॉस'च्या घरात झाले एकाचवेळी ८ स्पर्धक नॉमिनेट

Bigg Boss OTT 3 Contestant Nominates : या आठवड्यामध्ये, चौथं नॉमिनेशन राऊंड पार पडलं आहे. या आठवड्यातही गेल्या आठवड्याप्रमाणेच तब्बल ८ स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले आहे.

Chetan Bodke

'बिग बॉस' हा रिॲलिटी शो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात असतो. सध्या 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व सुरु आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून सर्व स्पर्धकांमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे वाद होताना दिसत आहे. या आठवड्यामध्ये, चौथं नॉमिनेशन राऊंड पार पडलं आहे. या आठवड्यातही गेल्या आठवड्याप्रमाणेच तब्बल ८ स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले आहे.

यंदाच्या आठवड्यामध्ये 'जनतेचा एजंट' म्हणून लव कटारियाची निवड करण्यात आली आहे. कोणत्या स्पर्धकाला घरामध्ये ठेवायचे, कोणाला नाही आणि कोणाला नॉमिनेट करायचे. हा अधिकार त्याकडे असेल. त्याने अनेक स्पर्धकांना नॉमिनेट केलेले आहे. लवने या आठवड्यामध्ये, विशाल पांडे आणि शिवानी कुमारला चार स्पर्धक नॉमिनेट करण्याची अधिकार दिले आहे. हे दोघेही त्याचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. तर अरमान मलिक, कृतिका मलिक आणि मुनीषा खटवानीला तीन स्पर्धक नॉमिनेट करण्याचा अधिकार दिला आहे. तर लवने स्वत:ला, दीपक चौरसिया, चंद्रिका आणि सना मकबूलला दोन स्पर्धक नॉमिनेट करण्याचा अधिकार दिला आहे.

साई केतन राव, नॅजी, रणवीर शौरी आणि सना सुल्तानला एक स्पर्धक नॉमिनेट करण्याचा अधिकार दिला आहे. नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण होताच ज्या स्पर्धकाला सर्वाधिक नॉमिनेशन मिळाले आहे, त्यांची यादी जाहीर केली आहे. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात १३ स्पर्धकांपैकी ८ जणांना घरातून नॉमिनेट केले आहे. या ८ स्पर्धकांमध्ये विशाल पांडे, अरमान मलिक, दीपक चौरसिया, सई केतन राव, सना मकबूल, मुनिषा खटवानी, दीपक चौरसिया आणि सना सुलतान यांच्या नावाचा समावेश आहे. यातून कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नॉमिनेट झालेल्या सर्व स्पर्धकांच्या वोटिंग लाईन्स ओपन झालेल्या आहेत. आत्तापर्यंत या शोचे तीन एलिमिनेशन झाले आहेत. बॉक्सर नीरज गोयत, पायल मलिक आणि पौलोमी दास यांना शोमधून बाहेर काढण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT