Deepak Chaurasia Eliminated From Bigg Boss OTT 3  You Tube
मनोरंजन बातम्या

Deepak Chaurasia Eliminate : दीपक चौरसियाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला, बाहेर येताच करणार अनेक धक्कादायक खुलासे

Deepak Chaurasia Eliminated From Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी ३' हा शो आता फिनालेच्या दिशेने वाटचाल करत आहे. शो सुरू चार आठवडे झाले असून चार आठवड्यात घरातील ६ स्पर्धकांना घराच्या बाहेर जावं लागले आहे.

Chetan Bodke

'बिग बॉस ओटीटी ३' हा शो आता फिनालेच्या दिशेने वाटचाल करत आहे. शो सुरू चार आठवडे झाले असून चार आठवड्यात घरातील ६ स्पर्धकांना घराच्या बाहेर जावं लागले आहे. यामध्ये एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाचीही एन्ट्री झालेली आहे. नुकत्याच विकेंडमध्ये झालेल्या ‘वीकेंड का वार’ मध्ये, देशातील सुप्रसिद्ध पत्रकार दीपक चौरसिया यांना शोमधून बाहेर काढण्यात आले आहे, जे सर्वांसाठीच धक्कादायक होते.

दीपक चौरसिया बिग बॉसच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती होते. त्यामुळे त्यांना सर्वच स्पर्धक मान द्यायचे. पण दीपक यांना ते आवडत नव्हते. अनेक स्पर्धकांच्या मते, त्यांनी स्वत:ची इमेज बिग बॉसच्या घरात म्हणावी तशी क्रिएट केली नाही. त्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट करण्यात आले. ते बिग बॉसच्या घरातही नेहमीच पत्रकारांच्या स्टाईलमध्येच वागत होते. कोणत्याही गोष्टीवर जेव्हा चर्चा करायची त्यावेळीही त्यांची वागणूक तशी असायची. त्याची अशी वागणूक अनेकांना खटकत होती.

त्याशिवाय, त्यांच्या अनेक वागणुकीमुळेही त्यांना बिग बॉसच्या घरातून नॉमिनेट करण्यात आले. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये दीपक चौरसिया यांनी सांगितले की, "बिग बॉसच्या घरातील माझा अनुभव मी लवकरच माझ्या चाहत्यांसोबत मी शेअर करणार आहे. त्याशिवाय सर्वांच्याच वागणुकीबद्दलही मी खूप काही खुलासे करणार आहे. मी गुपित लपवून ठेवली आहेत. माझ्या ३१ वर्षांच्या करियरमध्ये मी माझ्या मनात अनेक गुपित साठवली आहेत. जर मी त्यांचा खुलासा केला ना तर अनेकांना त्याचा त्रास होईल."

येत्या काही दिवसांमध्ये, दीपक चौरसिया कोणते कोणते खळबळजनक खुलासे करणार ? हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल. गेल्या काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून अदनान शेख आला आहे. अदनानचं आणि दीपक यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं.

गेल्या काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातून अनेक स्पर्धक बाहेर पडले आहेत. नीरज गोयत, पायल मलिक, पौलोमी दास, टॅरो कार्ड रिडर मुनिषा खटवानी, वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित हे स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर आले आहेत. आता त्यानंतर सहावा स्पर्धक पत्रकार दीपक चौरसिया एलिमिनेट झाला आहे. सध्या घरात सना मकबूल, साई केतन राव, अरमान मलिक, शिवानी कुमारी, सना सुलतान, विशाल पांडे, लव्ह कटारिया, रॅपर नॅजी आणि वाईल्ड कार्ड स्पर्धक अदनान शेख हे स्पर्धक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT