'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT 2) विनर एल्विश यादव (Elvish Yadav) सध्या चर्चेत आला आहे. एल्विश यादवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. त्याने रविवारी रात्री जयपूरमधील रेस्टॉरंटमध्ये राडा केला. एल्विश यादवने या ठिकाणी एका व्यक्तीच्या कानाखाली मारली. एल्विशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल (Elvish Yadav Viral Video) होत आहे. नेमकी ही घटना काय आहे? आणि एल्विशने ज्या व्यक्तीच्या कानाखाली मारली ती व्यक्ती नेमकी कोण आहे? हे आपण जाणून घेणार आहोत...
'बिग बॉस ओटीटी 2'चा विनर एल्विश यादव जयपूरमधील एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीसोबत भांडताना दिसला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संतप्त झालेला एल्विश यादव एका व्यक्तीच्या कानाखाली जोरात मारतो. एल्विश यादव त्या व्यक्तीला मारतो आणि बाहेर निघून जात असतो. पण ती व्यक्ती काही तरी एल्विशला बोलते आणि तो पुन्हा त्या व्यक्तीला मारण्यासाठी धावून जाताना दिसत आहे. पण एल्विशला त्याच्या मित्रांनी थांबवले आणि रेस्टॉरंटमधून बाहेर काढले. या व्हिडीओमध्ये पोलिसांनी देखील या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचे दिसत आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एल्विशने त्याच्या कृतीचा बचाव करताना एक ऑडिओ स्टेटमेंट जारी केले. एल्विशने दावा केला की, त्याने त्या व्यक्तीला कानाखाली मारली कारण त्याने त्याला शिवीगाळ केली होती. या व्हिडीओच्या माध्यमातून एल्विश सांगतो की, 'मित्रांनो बघा ही गोष्ट अशी आहे की, मला ना मारामारी करण्याची इच्छा आहे. ना मला कोणावर हात उचलण्याची इच्छा आहे. मी माझ्या स्वतःच्या कामात लक्ष घालतो.'
एल्विशने पुढे सांगितले की, 'मी नॉर्मल चालतो आणि जो कोणी फोटो काढायला सांगेल त्यांना मी फोटो काढून देतो. पण, मागून प्रतिक्रिया देणाऱ्या कोणालाही मी सोडत नाही. तुम्ही बघू शकता, आमच्यासोबत पोलिस आणि कमांडो होते. आम्ही काही चुकीचे केले असे नाही. हे वैयक्तिक होते. त्याने माझी वैयक्तिक खोड काढली. मी स्वतः जाऊन त्याच्या कानाखाली मारली. मला याबद्दल काही खेद नाही. मी असाच आहे. त्याने शिवीगाळ केली आणि मी माझ्याच स्टाइलमध्ये त्याला उत्तर दिलं.' आता या घटनेमुळ एल्विश यादव चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.