Bigg Boss OTT 2's Jiya Shankar Prank With Elvish Yadav Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Update : जिया शंकरचा एल्विश यादवसोबत भयंकर Prank; VIdeo पाहून नेटकरी मात्र संतापले

Jiya Shankar Prank With Elvish Yadav : जिया शंकरने एल्विश यादवला हॅन्डवॉश मिक्स केलेले पाणी प्यायला दिले.

Pooja Dange

Bigg Boss OTT 2's Jiya Shankar Prank : बिग बॉस ओटीटी २ सध्या चर्चेत आहे. शोचा टीआरपी वाढविण्यासाठी निर्माते वेगवगेळ्या स्पर्धकांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देत शोमध्ये आणत आहेत.

मंगळवारी रात्री बिग बॉस OTT 2 च्या चाहत्यांना धक्का बसला. जिया शंकरने एल्विश यादवला हॅन्डवॉश मिक्स केलेले पाणी प्यायला दिले. वाइल्ड कार्ड स्पर्धक एल्विश यादवला हुकूमशाह झाला होता.

तर त्याला इतर घरातील सदस्यांना काम सांगायचे होते आणि सदस्यांनी त्याचे पालन देखील करायचे होते. त्याने जियाला पिण्यासाठी पाणी मागितले तिने त्यात हँडवॉश मिसळला आणि त्याला ते दिले. एल्विशने ते पाणी प्यायले देखील. (Latest Entertainment News)

जिया आणि अविनाश सचदेव यांना हसताना पाहिल्यानंतर अभिषेक मल्हानने एक इशारा केला. त्यानंतर त्यांनी पाण्याचा वास घेतल्यानंतर, त्यांना कळले की ते त्या पाण्यात काहीतरी गडबड आहे, ज्यानंतर एल्विशने जियाकडून ते वाढवून घेतलं.

स्वतःचा बचाव करत तिने पाणी कसे दूषित दिसत होते आणि साबणाचा वास कसा होता हे सांगितले, तरीही तिने ते का प्यायले असा उलट प्रश्न तिने केला. ती म्हणाली की एल्विशला माहित असले पाहिजे आणि सावधगिरी बाळगली पाहिजे.

अविनाशने तिला पाठिंबा दिला, तर घरातील इतर सहकाऱ्यांनी कोणाच्या तरी आरोग्याला धोका पोहचेल अशा जियाच्या कृत्यावर टीका केली आहे.

ट्विटरवरही चाहत्यांनी जियाच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे आणि 'शेम ऑन जिया' असा ट्रेंड सुरू केला. बिग बॉसच्या एका फॅन पेजने जिया आणि अविनाशचा एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "सर्वात वाईट आहे! एल्विश यादवला हँडवॉशचे पाणी पिताना पाहून हे लोक हसत आहेत. निव्वळ निर्लजपण.'

मायक्रो-ब्लॉगिंग साइटवरील कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, "जिया सर्व चांगले काम करते परंतु ती एक दयाळू व्यक्ती नाही", "जायला असं करताना आम्ही पाहू शकत नाही तिला घरातून बाहेर काढा. #ElvishYadav," आणि "हे खूप अनाकलनीय होते. त्यामुळे त्याचे गंभीर नुकसान होऊ शकतात. साबण खाण्यायोग्य नाही, जियाला माहित नाही का?"

वीकेंड का वार एपिसोड दरम्यान सलमान खान या विषयावर जिया कशी शाळा घेईल अशी चर्चा सुरू आहे. नक्की बॉलीवूड स्टार गेल्या आठवड्यात शोमध्ये दिसला नाही. परंतु पुढील भागांसाठी तो शूट करेल अशी अपेक्षा आहे.

बिग बॉस OTT 2 ला दोन आठवड्यांसाठी मुदतवाढ मिळाल्यानंतर, एल्विश यादव आणि आशिका भाटिया यांना वाईल्ड कार्ड म्हणून आणण्यात आले. त्यांच्या व्यतिरिक्त, शोमध्ये सध्या अभिषेक मल्हान, पूजा भट्ट, मनीषा राणी, जिया शंकर, अविनाश सचदेव, फलक नाज, बेबीका धुर्वे आणि जाद हदीद हे स्पर्धक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

SCROLL FOR NEXT