Jiya Shankar Gets Nominated In Bigg Boss OTT 2 Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Update : जिया शंकरने घेतला नॉमिनेशनचा धसका! हुंदके देताना पाहून नेटकरी बिथरले

Bigg Boss 2's Jiya Shankar : सलग दुसऱ्या आठवड्यात जिया नॉमिनेट झाली आहे.

Pooja Dange

Jiya Shankar In BB OTT 2 : बिग बॉस ओटीटीचं २ पर्व सुरू झालं आहे. प्रेक्षकांनी या पर्वाला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या शोमधील स्पर्धकांना प्रेक्षकांची पोचपावती मिळायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी जिया शंकर या शोमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

नुकतच शोमध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला. या नमिनेशन टास्क दरम्यान जिया शंकर पॅनिक आल्याचं दिसले.पहिल्या आठवड्यात पलक पुरसवानी ही घराबाहेर गेली. त्यानंतर लगेचच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये जिया शंकर आणि आलिया सिद्दिक्की नॉमिनेट झाल्या आहेत.

सलग दुसऱ्या आठवड्यात जिया नॉमिनेट झाली आहे. पहिल्या आठवड्यातही नॉमिनेट झाल्यामुळे जियाला खूप दुखावली होती. तर आताच्या पुन्हा नॉमिनेशनने झाल्याने ती पुर्णपणे खचून गेली आहे.

बिग बॉसच्या घरात जियाला अॅडजस्ट करायला अवघड जात आहे. त्यामुळे घरातील इतर सदस्य तिला टार्गेट करत आहेत. जियाच्या एका फॅनपेजवरुन नॉमिनेशन टास्कचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओत जियाचे रडून रडून बेहाल झाल्याचे दिसत आहे. जिया बिग बॉसकडे घरी जाण्यासाठी विनवणी करताना दिसत आहे. त्यानंतर जियाला पॅनिक अॅटॅक आल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत घरातील इतर सदस्य आपापल्या जागी उभे आहेत तर आकांशा पुरी जियाला सावरताना दिसत आहे. (Latest Entertainment News)

जिया शोच्या सुरवातीला पूजा भट, फलक नाज आणि अविनाश सचदेव यांच्या ग्रुपमध्ये होती. पण अचानक ती दुसऱ्या ग्रुपमध्ये गेल्यामुळे जायचा गेलं बदलला. नॉमिनेशन दरम्यान जवळचा मित्र अविनाश सचदेवने नॉमिनेट केल्यामुळे जियाच्या चाहत्यांनी मात्र अविनाशवर प्रचंड रोष व्यक्त केला आहे.

अनेकांनी कमेंट्स करत जियाची काळजी व्यक्त केली आहे. एकाने लिहलय की, 'घरातील सर्व लोक जियाला मुद्दामहून टार्गेट करत आहे'. तर दुसऱ्याने म्हटले आहे की, 'आम्ही तुझ्यासोबत आहोत जिया, घाबरु नको'. अजून एकाने म्हटलय की, 'मी जियाला असे खचताना नाही पाहू शकत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कारला धडक दिल्याने अभिनेत्रीची सटकली, फटाके फेकत भररस्त्यात राडा; म्हणाली- 'माझी दिवाळी...', VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! १० तोळ्यांवर किती हजाराची बचत? भाऊबीजेला घ्या नवा दागिना

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT