Bigg Boss OTT 2 Weekend Ka War Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2: ‘विकेंड का वार’मध्ये सलमान खानने स्पर्धकांची घेतली शाळा, आलिया, आकांक्षाला सुनावले खडेबोल...

Bigg Boss OTT 2 Daily Update: शनिवारी ‘विकेंड का वार विथ सलमान खान’मध्ये होस्ट सलमान खानने स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

Chetan Bodke

Bigg Boss OTT 2 Latest Episode: सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस ओटीटी २’ ची तुफान चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या शोमध्ये पहिल्याच आठवड्यातच एका स्पर्धकाला एव्हिक्टेड करण्यात आले. हे बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. नुकतंच शनिवारी या शोमध्ये ‘विकेंड का वार विथ सलमान खान’ हा शो पार पडला होता. या सीझनमध्ये सलमान खान होस्ट करत असून त्याने कालच्या एपिसोडमध्ये सर्वच स्पर्धकांची कानउघडणी केली आहे. सर्वांनाच त्याच्या खुमासदार शैलीत सर्वच स्पर्धकांची शाळा घेतली.

मनीषने शोमध्ये एक टास्क होस्ट केला होता, त्या टास्कमध्ये स्पर्धकांना एका विचित्र चित्रपटाचे नाव दुसऱ्या स्पर्धकाला देण्यास सांगितले होते. यादरम्यान सलमान खानही स्टेजवर आला आणि स्पर्धकांसोबत हा टास्क खेळला. यावेळी सलमानने अभिषेकला सल्ला दिला की, त्याने घरात मस्त एन्ट्री केली आहे, पण आता तो काही कारणामुळे मागे पडलेला दिसतोय. भाईजान अभिषेक मल्हानला शोमध्ये ज्या उत्साहाने प्रवेश केला होता, तोच उत्साह, तोच जल्लोष पुन्हा दिसायला हवा असा सल्ला सलमानने दिला.

अभिषेक मल्हाननंतर सलमान खानने आकांक्षा पुरीची शाळा घेतली आहे, सध्या या आगामी एपिसोडचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. आधी सलमानने आकांक्षाला एका खास सीटवर म्हणजेच काटेरी खुर्चीवर बसवले. तिने खोटे काम केल्यामुळे तिला बाबिका धुर्वेने चांगलेच सुनावले. सलमान आकांक्षा पुरीला म्हणतो, तु सारखा सारखा बेबिकाचा पानउतारा का करते? तु तिला सतत धोकादायक म्हणून का बोलते. तिच्या मानसिक स्थितीवर आणि मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिच्यासाठी वैद्यकीय तपासणी का सुचवत आहे.

सलमान आकांक्षा पुरीला म्हणतो, “तुझी गॉसिप्स बनवण्याची आणि खोट्या स्टोरी बनवण्याची सवय फक्त घरातच नाही तर घराबाहेर देखील आहे. कोणतेही तथ्य नसलेल्या आणि खोट्या गोष्टी सांगण्याची काहीही गरज नाही. जर तुला वाटत असेल की, बेबिका तुला दुखावतेय, तर तु चुकीची आहेस.”

सोबतच यावेळी सलमानने नवाझुद्दिन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी हिच्यावर देखील जोरदार टिका केली. आलियाने बिग बॉसच्या घरातील सदस्यांसमोर नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या तिच्या पूर्वीच्या नात्याबद्दल आणि अयशस्वी लग्नाबद्दल घरातील काही सदस्यांना सांगत होती. त्या करिता सलमानने आलिया फारच वाईट पद्धतीने तिला बोलला.

फलक नाझ, जिया शंकर, अभिषेक मल्हान (फुकरा इन्सान), मनीषा राणी, जद हदीद, आलिया सिद्दीकी, पुनीत सुपरस्टार, बेबिका ध्रुव आणि अविनाश सचदेव यांचा बिग बॉस ओटीटी २ च्या घरामध्ये प्रवेश झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

SCROLL FOR NEXT